जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमशेत येथे मराठी भाषा गौरव दिन विविध उपक्रम आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी बाल साहित्य दिंडी काढण्यात आली.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला .मराठी भाषा गौरव दिनाच्या बाल सभेमध्ये आर्या डोके हिने सुत्र संचालन केले,पुर्वा डोके,आराध्या भास्कर,आर्या डोके,भक्ती भास्कर,श्रुती डोके,वेदश्री डोके,प्रज्वल नाईकवाडी,सानवी डोके बाल साहित्यिकांनी आपल्या कविता सादर केल्या
, रूद्र डोके,जय डोके तनुज डोके यांनी दैनिक अनुभव लिहिलेले वाचून दाखवले,साई डोके,श्रेयस डोके,स्वयंम डोके पुर्वा डोके,प्रसाद डोके, ईश्वरी डोके संवाद लिहून वाचून दाखवले, ज्ञानेश्वरी व ईश्वरी शेलार पहिलीतील मुलांनी पाठ्यपुस्तकातील कवींच्या कविता तालासुरात सादर केल्या काही विद्यार्थ्यांनी साहित्य दिंडी स्वतः बनवली.विद्यार्थी मध्ये वेगळाच आनंद झाला.आपल्या कविता सादर केल्या संवाद लेखन,अनुभव लेखन, निबंध लेखन केले.गोष्ट, कविता संवाद वाचन केले. श्याम लोलापोड सरांनी मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व सांगितले तर यशवंत घोडे माय मराठी व मराठी भाषा वाचवा स्वरचित कविता सादरीकरण केल्या.
विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण झाली.लेखना विषयी प्रेरणा निर्माण झाली.शेवटी प्रज्वल नाईकवाडी इ. ३री या छोट्या बाल साहित्यिकांने आभार मानले.
:– माय मराठी माझी–:
माय मराठी माझी मायबोली आहे मधाळ,राकट कणखर;जणू तलवार ती शब्द रत्नांची खोलवर कोरली आहे खरोखर भिन्न प्रकारची बोलीभाषा माय मराठीचा रांगडा बोल खास;ओवी, अभंग, गवळणी ,लावणीतून दरवळे भाषा सौंदर्याची रासपोवाडे, गप्पा ,गाणी, गोष्टीतून रूढी परंपरेचा जपून ठेवला वसा;इतिहासाच्या पानोपानी निडर शुरवीरांच्या शौर्याचा उमटला ठसा..पुत्र शूर वीर धाडसी घडविलेमाय मराठीने बीज परले क्रांतीचे;स्वराज्य ,स्वातंत्र्य मिळवून दिले वैभवशाली , गौरवशाली शांतीचे..प्रसिद्ध समृद्ध माझी मराठी भाषाज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाचा देते मेवा;माय मराठी मायबोली महाराष्ट्राची राजभाषा प्रत्येकाने जपून ठेवा..—————————————- कवि:- यश घोडे फोफसंडीकर