शिरूर येथील गुरुकृपा लॉन्स याठिकाणी घेण्यात आलेल्या नॅशनल लेव्हल पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.यावेळी उपस्थित मान्यवर.

गोलेगाव प्रतिनिधी : चेतन पडवळ

ता.२७ अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आज काळाची गरज आहे. जिवनात व्यावहारिक गणिताला उच्चतम स्थान असून बौद्धिक स्तर वाढविण्यासाठी अबॅकस हा चांगला पर्याय असल्याचे मत शिरूर निवासी नायब तहसीलदार स्नेहा गिरी गोसावी यांनी नुकतेच घेण्यात आलेल्या एवरेस्ट अबॅकस अकॅडमी वतीने आयोजित केलेल्या स्पर्धेत व्यक्त केले. नुकतेच शिरूर येथील गुरुकृपा लॉन्स याठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नॅशनल लेव्हल अबॅकस कॉम्पिटिशन कार्यक्रमात स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेसाठी पुणे.तसेच अहमदनगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने स्पर्धक उपस्थित होते.

सकाळी दहा वाजता पेपर घेण्यात आले , दुपारी 3 वाजता विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुणे शिरूर निवासी नायब तहसीलदार स्नेहा गिरी गोसावी, गंगा एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका अमृतेश्वरी घावटे, समप्रभा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. धनंजय नाईक, विद्याधाम प्रशाला देवदैठण मुख्याध्यापक बाळासाहेब दहिफळे , दैनिक समर्थ भारत वृत्तसेवा पत्रकार चेतन पडवळ , शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांक विभागाचे राजुद्दीन भाई सय्यद, या सर्व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

शिरूर मध्ये 23 वी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा पार पडली या स्पर्धेमध्ये शिरूर , पुणे, शिक्रापूर, कर्जत , श्रीगोंदा, टाकळी हाजी, देव दैठण, न्हावरा, नारायणगव्हाण , चास , करंदी यासारख्या वेगवेगळ्या तालुका व गावांमधून 823 विद्यार्थी सहभागी झाले होते. या वेळी आदर्श शिक्षिका प्रतिभा पुजारी व सुवर्णा ठोकळ यांना दुसऱ्यांदा व वैशाली लोंढे यांना तसेच अजित म्हस्के यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी अबॅकस च्या सर्व लेव्हल पूर्ण करणाऱ्या श्रावणी चौधरी या विद्यार्थिनीला अबॅकस मास्टर ही पदवी बहाल करण्यात आली, तर चॅम्पियन म्हणून सर्वेश कोल्हे, आरोही देसाई , श्लोक खेडकर , ओम बारी , धनश्री अहिरराव, सौम्य हराळ , श्लोक कोरके , वेदिका शेजाळ, आदिराज कोलते , खोले वैष्णवी , साई खेतमाळीस, स्वराज मिडगुल, तन्मय बरशिले , आराध्या गवारे , नीरज शेळके , मनन पिंपरकर, मेघांत वैद्य , आराध्या यादव, शुभेच्छा गायकवाड, श्रावणी चौधरी या स्पर्धकांना घोषित करण्यात आले. परीक्षेत विद्यार्थ्यांनी पाच मिनिटात 165 बेरीज आणि वजाबाकी , 137 गुणाकार, 127 भागाकार , तर 108 वर्ग संख्या सोडवल्याने पालक व मान्यवर यांना विशेष कौतुक वाटले. या स्पर्धेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. .

या परीक्षेचा हेतू व उद्देश प्रतिभा पुजारी यांनी प्रास्ताविकातून सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रपती पुरस्कार विजेते अमोल बागुल सर यांनी केले तर आभार प्रणिता पाटील यांनी मानले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button