जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
ओतूर ता:-जुन्नर येथील ग्राम विकास मंडळ ओतूर या संस्थेचा ७१ वा वर्धापन दिन आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाल्याची माहिती संस्थेचे सचिव प्रदीप गाढवे यांनी दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे होते.
ग्राम विकास मंडळ,ओतूर ही उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा यामध्ये अग्रगण्य असणारी प्रथितयश संस्था आहे .१९५३ मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. तत्पूर्वी १९४५ मध्ये लोकल बोर्ड च्या माध्यमातून चैतन्य विद्यालय,ओतूर ही शाळा सुरू झाली.याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांची ३९४ वी जयंती विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाली.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक वेशभूषा केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे व भाषणे पण यावेळी सादर करण्यात आली.
यावेळी युवा शिवव्याख्याते वैभव डेरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.आपल्या व्याख्यानात श्री डेरे म्हणाले की,”छत्रपती शिवराय हा विचार आहे.त्या विचारांना डोक्यात घ्या,त्यांना डोक्यावर घेऊ नका.निवळ नाचून छत्रपती शिवाजी महाराज समजणार नाहीत, तर त्यांचे विचार अंगीकारणे महत्त्वाचे आहे.”
यावेळी उपाध्यक्ष प्रभाकर तांबे,राजेंद्र डुंबरे, रघुनाथ तांबे,आत्माराम गाढवे,प्रकाश डुंबरे,रोहिदास घुले,शांताराम पानसरे,नितीन तांबे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे,राजश्री भालेकर,संजय हिरे,तीनही विद्यालयांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी सोनाली माळवे,संजय डुंबरे,मंगेश कोंडार,ज्ञानेश्वर वळे यांनी विशेष परिश्रम घेतले.भाऊसाहेब खाडे यांनी प्रlस्ताविक केले.शरद माळवे यांनी सूत्रसंचालन केले तर सहसचिव पंकज घोलप यांनी आभार मानले.