जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
नारायणगाव ता:-जुन्नर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्वरमल्हार गीत गायन स्पर्धेत ग्रामोन्नती मंडळाचे गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिरातील प्रणव नेवकर या बालगायक कलाकाराने इयत्ता ५ वी ते ७ वी या लहान गटातील भजन गायनात द्वितीय क्रमांक मिळवून उपविजेतेपद पटकाविले,अशी माहिती मुख्याध्यापिका अनुराधा पुराणिक व विभाग प्रमुख पूनम गोसावी यांनी दिली.
पुणे येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात राज्यस्तरीय स्वरमल्हार गीत गायन स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.महाराष्ट्र राज्यातील नामवंत शाळेतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उस्फूर्त सहभाग घेतला होता.भजन गायन स्पर्धेत प्रणव याने “कानडा राजा पंढरीचा” हे उत्कृष्ट भजन सादर करून सर्वांची मने जिंकली. ग्रामोन्नती मंडळाचे संगीतशिक्षकराहुल दुधवडे तसेच पूनम गोसावी यांनी प्रणव यास विशेष मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल प्रणव याचा ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष अनिलतात्या मेहेर,उपाध्यक्ष सुजित खैरे, कार्यवाह रवींद्र पारगावकर व सर्व संचालक, मुख्याध्यापिका अनुराधा पुराणिक, उपमुख्याध्यापक सतीश तंवर यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.