तालुका पदाधिकारी यांना नियुक्ती व ओळखपञाचे वाटप.
शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार
द युवा ग्रामीण पञकार संघ महाराज्य शिरूर तालुका आयोजित मराठी दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन व शिरूर तालुका कार्यकारणी पदाधिकारी नियुक्तीपञ वाटप कार्यक्रम द युवा ग्रामीण पञकार संघाचे संस्थापक अध्यक्ष पञकार मा.अन्सार शेख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक अध्यक्ष अँड.डॉ.मा.अरूण (आबा) जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच द युवा ग्रामीण पञकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष पञकार मा.रिजवान बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय शिरूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
मराठी दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन शिरूर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलिस निरिक्षक मा.अमोल पन्हाळकर साहेब,आजतक हिंदी न्युज चँनेलचे पुणे/अहमदनगर प्रतिनिधी मा.रोहित वाळके साहेब,युवा उद्योजक बंटीशेठ घायतडक,दैनिक लोकनायक वृत्तपञाचे व्यवस्थापक मा.विश्वंभर मुळे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मा.तात्यासाहेब सोनवणे,द युवा ग्रामीण पञकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष मा.शामभाऊ कांबळे,निमोणे गावचे सरपंच मा.संजय (आबा) काळे,मा.आदर्श सरपंच जिजाताई दुर्गे,देवदैठण गावचे मा.सरपंच मंगलताई कौठाळे,सामाजिक कार्यकर्ते हाजी सादिकभाई बागवान,शालेय व्यवस्थापन समितीचे निर्वी अध्यक्ष मा.प्रदिपभाऊ साळुंकेशरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष मा.नवनाथ गव्हाणे,श्रीपाद उद्योग समुहाचे अध्यक्ष मा.कमलेश बुराडे,द युवा ग्रामीण पञकार संघाचे नगर तालुकाध्यक्ष मा.हेमंत साठे,सदस्य बिभिषण झेंडे आदि मोठ्या संख्येंने होते.यावेळी द युवा ग्रामीण पञकार संघाची शिरूर तालुका कार्यकारणी जाहिर करण्यात आली.तसेच सर्व पदाधिकारी यांना प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करून संघटनेचे अधिकृत नियुक्तीपञ व ओळखपञाचे वाटप करण्यात आले.
यावेळी द युवा ग्रामीण पञकार संघाचे तालुकाध्यक्ष शकील मनियार,तालुका उपाध्यक्ष विवेकानंद फंड,विश्वनाथ घोडके,तालुका सचिव अक्षय वेताळ,तालुका कार्याध्यक्ष सुजित मैड,तालुका संपर्कप्रमुख विजय कांबळे,तालुका सल्लागार संतोष काळे,तालुका कोषाध्यक्ष मच्छिंद्र काळे,तालुका खजिनदार संजय मोरे,तालुका संघटक सुदर्शन दरेकर,तालुका सरचिटणीस सुनिल काटे,कायदेविषयी सल्लागार एडवोकेट इन्नुस मणियार आदिंना मान्यवरांच्या उपसथितीमध्ये नियुक्तीपञ व ओळखपञाचे वाटप करून कौतुक करून अभिनंदन करण्यात आले.