जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
महाराष्ट्रा – अ जॉग्राफिकल अप्रोच” या संशोधन प्रबंधासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा तर्फे पीएच.डी (विद्यावाचस्पती) ही शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी प्रदान करण्यात आली आहे. संशोधन कार्यासाठी डॉ. विलास पाटील प्राचार्य, श्री शाहू महाविद्यालय पर्वती पुणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.अर्जुन मुसमाडे, पुणे विद्यापीठ भूगोल विभाग प्रमुख डॉ. सुधाकर परदेशी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता व आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे कॉलेजचे प्राचार्य डॉ. मनोहर चासकर, भूगोल संशोधन विभाग प्रमुख डॉ. सुचित्रा परदेशी यांचे प्रमुख सहकार्य लाभले.
रमेश गोपाळे हे श्री नारायण दत्तू गोपाळे आणि लक्ष्मी नारायण गोपाळे यांचे चिरंजीव खेड तालुक्यातील साबुर्डी गावचे असून अतिशय सामान्य गरीब कुटुंबात जन्म घेऊन प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाचे एक एक टप्पे पूर्ण करीत, आज यशाचे शिखर गाठताना त्यांचा प्रवास अतिशय खडतर होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे साबुर्डी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले असून, माध्यमिक शिक्षण श्री सिद्धेश्वर विद्यालय वेताळे, उच्च माध्यमिक शिक्षण रामभाऊ म्हाळगी विद्यालय कडूस, महाविद्यालयीन शिक्षण हुतात्मा राजगुरू महाविद्यालय तर पदव्युतर पदवी शिक्षण पुणे विद्यापीठातून पूर्ण केले आहे. त्याचबरोबर ते भूगोल विषयात जून २०१४ मध्ये सेट परीक्षा तर सप्टेंबर २०१५ मध्ये नेट परीक्षा उत्तीर्ण झाले व आता शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पीएचडी पदवी मिळविली आहे. त्यांच्या घरात कुठलीही शैक्षणिक परंपरा नसताना आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना देखील एका सामान्य, गरीब शेतकरी कुटुंबातून आलेल्या एका तरुणाने आपल्या जिद्द, चिकाटी व मेहनतीने ही पदवी मिळवली आहे. एकंदरीत
या तरुणाची ही कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्या ग्रामीण भागातील समाजामध्ये त्यांचे शिक्षणाविषयीचे प्रेम कौतुकास्पद आहे. त्यांना मिळालेल्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.त्यांच्या या यशात त्यांचे कुटुंब पत्नी सौ. योगिता रमेश गोपाळे, मुलगा चि. सात्विक रमेश गोपाळे, भाऊ बबन गोपाळे आणि चुलते पांडुरंग गोपाळे यांचा मोलाचा वाटा आहे असे ते सांगतात. डॉ. रमेश गोपाळे यांचे संशोधन कार्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले आहे. ते सध्या आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयात गेल्या अनेक वर्षापासून ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.