शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामधील पूर्व भागात असलेल्या गुनाट गावामध्ये दत्त जयंती सोहळ्या निमित्त आलेले पारनेर – नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार व कोरोना योद्धा लोकनेते निलेश लंके यांचा गुनाट ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.यावेळी आमदार निलेश लंके यांनी बोलताना सांगितले की, या गुनाट नगरीतील वैभवात भर टाकणारी सुंदर आणि सुबक मूर्ती मी कुठेच पाहिली नाही एका छोट्याशा ग्रामीण भागात एवढे मोठे तीर्थक्षेत्र दत्त देवस्थान असणे भाग्यच म्हणावे लागेल पुढील काळात मी या तिर्थक्षेत्र असलेल्या गावच्या वैभवात भर टाकण्यासाठी नक्कीच प्रयत्न करीन तसेच ग्राम सचिवालयास भेट दिली असता आपली जनता पुढे असेल तर गावचे प्रथम नागरिक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे व ग्रामसचिवालयात छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याभिषेक सोहळ्याचे प्रतिमा असावी असे त्यांनी सांगितले यावेळी लाकुडझोडे सर, मा.सरपंच गणेश कोळपे,सचिन कोळपे, गोरक्ष धुमाळ, ग्राम.सदस्य सतिष सोनवणे सर, ग्राम.सदस्य रामदास काकडे, पांडूरंग गव्हाणे,भिवसेन कोळपे, नवनाथ धुमाळ सर, आण्णा भालेराव सर,अनिल भालेराव, दत्तात्रय गाडे, समिर शेख, अमोल करपे,आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक वृंद, युवा तरुण वर्ग यावेळी उपस्थित होते.