जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर

बीटस्तरीय कला,क्रीडा,अनुदानित यशवंतराव सांस्कृतिक आश्रमशाळा चव्हाण महोत्सव आलमे येथे नुकताच संपन्न झाला यामध्ये ओतूर बीट मधील उदापूर,रोहोकडी,बल्लाळवाडी याकेंद्रातील केंद्रस्तरीय स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळवलेल्या संघ स्पर्धकांची १४ क्रीडा प्रकारात स्पर्धा अनुदानित आश्रमशाळा आलमे येथे घेण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद व नियोजन समिती सदस्य अंकुश आमले होते.कार्यक्रमांचे प्रास्ताविक बल्लाळवाडी केंद्रप्रमुख स्वप्नजा मोरे यांनी केले क्रीडा स्पर्धेची सुरूवात यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमापूजनाने झाली. तीनही केंद्रातील खेळाडूंनी मान्यवरांना सलामी देऊन मानवंदना दिली.क्रीडाज्योतीचे प्रज्वलन झाल्यानंतर खेळाडूंनी मैदानाला मशाल हाती घेऊन फेरी मारली आलमे गावच्या प्रथम नागरिक सरपंच शितल फोडसे यांनी उपस्थित खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. माजी सरपंच परशुराम गोपाळे यांनी खेळाचे महत्व सांगितले.

अध्यक्षीय भाषणात अंकुश आमले यांनी मोबाइलच्या जास्त वापरामुळे आजची तरुण पिढी खेळापासून दूर चालली आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी नियम, शिस्त, आत्मविश्वास यासाठी खेळ खेळले पाहिजे आयुष्यात हार जित होत असते म्हणून आपला आत्मविश्वास कमी न होता आपण उत्तम नियोजन, मार्गदर्शन यांच्या जोरावर यश संपादन केले पाहिजे असे सांगितले. त्यानंतर खो खो च्या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या वेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश शिंदे, उपसरपंच आलमे राहुल फोडसे, चेअरमन अनिल फोडसे, प्रमोद खुटले, अनंथा शिंदे, अरुण नायकोडी, उदापूर केंद्रप्रमुख प्रदिप दिघे, रोहोकडी केंद्रप्रमुख प्रभाकर दिघे, माध्यमिक आश्रमशाळा मुख्याध्यापक भगीरथ पठारे, प्राथमिक आश्रमशाळा सुदाम पवार, पंच म्हणून संतोष झावरे, विजय पवार, सुनिल खुपसे, रविंद्र अहिनवे, शिल्पा भालेराव, प्राची पठारे, इजाज मोमीन,शंकर पडवळ, गणपत डोंगरे, सखाराम वाळेकर,विलास घोलप,सुनिल डबीर,सुनिल हांडे, चौधरी, भरत नायकोडी,प्रदीप नलावडे,मारूती निर्मळ, राजेंद्र गारे,रघुनाथ बांबळे,सुनिल मोदे,नामदेव मुकणे, आशा शेळकंदे,लिला धिरडे,जयश्री तांबे,सुनिल चौधरी,पुष्पलता उकिरडे, बेबी शिंगोटे.,भैरव कराळे, रामदास गवारी, अहिरे, रविन्द्र काकडे, दत्तात्रय बेद्रे, यांनी सहकार्य केले. क्रीडास्पर्धा समनव्यक हनुमंत गोपाळे यांनी नियोजन केले क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्ती पत्रक सौजन्य संतोष नायकोडी यांनी केले तर ट्रॉपी सौजन्य ग्रामपंचायत आलमे, बाळासो तुकाराम नायकोडी यांनी केले. मान्यवरांच्या शुभहस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक विद्यार्थ्यांना देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य जि.प.शाळा आलमे यांनी उत्तम नियोजन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तुकाराम गायकर यांनी केले तर भरत रोंगटे यांनी आभार मानले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button