शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार
निमोणे (ता शिरूर) येथील माजी आदर्श सरपंच जिजाताई दुर्गे यांना भारत गौरव अल्हज असद बाबा मेमोरियल वूमन आयकॉन पुरस्कार 2023 घोषित करण्यात आला आहे.माजी आदर्श सरपंच जिजाताई दुर्गे यांनी आपल्या सरपंच काळामध्ये निमोणे गावासाठी भरघोस निधी उपलब्ध करून गावचे विकास कामे केली. त्याचबरोबर बेघरांना घरकुल देण्याचे काम त्यांनी केले तसेच महिलांच्या उन्नतीसाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला महिलांसाठी त्यांचे खूप मोठे योगदान आहे विविध क्षेत्रांमध्ये तसेच संघटनेमध्ये त्यांनी त्यांच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला.त्यांचे काम पाहून त्या कामाची दखल घेऊन ४४व्य राष्ट्रीय एकात्मता आणि सर्व धर्म समभाव या ऐतिहासिक सोहळ्यमध्ये त्यांना भारत गौरव अल्हज असद बाबा मेमोरियल वूमन आयकॉन पुरस्काराने २१ डिसेंबर रोजी सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा या आई जिजाऊंच्या नगरी मध्ये विविध देशाचे राजदूत ,सिने अभिनेते ,मान्यवर मंडळी आणि सर्व धर्मीय संत यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक मुंबई रत्न डॉ अमजद खान पठाण आणि डॉ सौ मेहराज पठाण यांनी कळविले आहे.