प्रतिनिधी : सचिन थोरवे
नारायणगाव पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमाने जुन्नर तालुक्यातील मुला मुलींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करत सुशिक्षित,गरजू व बेरोजगार युवक युवतींसाठी रोजगाराची नारायणगाव पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमाने जुन्नर तालुक्यातील मुला मुलींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करत सुशिक्षित,गरजू व बेरोजगार युवक युवतींसाठी रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून उमेदवारांना पाठवले प्रशिक्षणासाठी अहमदनगरला* सुवर्णसंधी उपलब्ध करून उमेदवारांना पाठवले प्रशिक्षणासाठी अहमदनगरला.
———–नारायणगाव पोलीस स्टेशन मीटिंग हॉल येथे दिनांक 07/12/2023 रोजी सकाळी 10/00 वा.चे दरम्यान *नारायणगाव पोलीस स्टेशन व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमासाठी मा.श्री.अंकित गोयल सो (भापोसे)पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मा.श्री रविंद्र चौधर सो,उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग जुन्नर, मा.श्री.दामोदर बोलकुंडलवार,स्टेट डायरेक्टर प्रथम एजुकेशन फाऊंडेशन,मा. श्री.दिवाकर भोयर,क्लस्टर हेड प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन, मा.श्री.ज्ञानेश्वर वायभासे,वेल्डिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर,प्रथम एज्युकेशन फाउंडेशन अहमदनगर, इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.* तसेच मा.श्री यशवंत नलावडे प्रभारी अधिकारी आळेफाटा पोलीस स्टेशन,मा.श्री.नारायण पवार प्रभारी अधिकारी जुन्नर पोलीस स्टेशन,डॉ.पंजाबराव कथे व नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्व पोलीस पाटील व पत्रकार बांधव,प्रशिक्षणार्थींचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*सदर कोर्समध्ये प्रामुख्याने 1) दुचाकी व चारचाकी गाडी रिपेरिंग,2) हॉटेल मॅनेजमेंट,3)जनरल ड्युटी असिस्टंट( नर्सिंग),4)प्लंबर,5) इलेक्ट्रिशियन,6)वेल्डर इ.कोर्सचे संपूर्ण मोफत प्रशिक्षण आयोजित केले असून निवासाची उत्तम सोय तसेच 45 दिवसांचे ट्रेनिंग दरम्यान मोफत चहा,नाश्ता व भोजन तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र व नामांकित कंपनीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देत नारायणगाव पोलीस स्टेशन व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन अहमदनगर यांनी युवक युवतींतीसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याने नागरिकांमधून सदर उपक्रमाबाबत कौतुक केले जात आहे.
सदर कार्यक्रमासाठी आलेले प्रथम एज्युकेशन फाउंडेशन अहमदनगरचे श्री दिवाकर भोयर साहेब यांनी विद्यार्थ्यांना वर नमूद सर्व कोर्स विषयी सखोल माहीती देऊन व्हिडिओ प्रेझेंटेशन केले.
तसेच माननीय पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल साहेब यांनी प्रशिक्षणाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या काळामध्ये संघर्ष करून निराश न होता कामामध्ये सातत्य ठेवून प्रशिक्षण पूर्ण करून स्वतःचे उज्वल भविष्य घडवणे बाबत प्रेरणादायी विचार प्रशिक्षणार्थी समोर मांडून मार्गदर्शन केलेव 45 दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या एकूण 75 प्रशिक्षणार्थींना प्रथम एज्युकेशन फाउंडेशन अहमदनगर येथे जाणे साठी मोफत बसेसचे आयोजन करून प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी जाणे साठी माननीय श्री अंकित गोयल सो यांचे हस्ते हिरवा कंदील दाखवून प्रथम एज्युकेशन फाउंडेशन अहमदनगर येथे रवाना केले.