शुभम वाकचौरे
राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेच्या शिरूर तालुका निहाय नूतन कार्यकारणी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या, अध्यक्षपदी एकनाथ थोरात यांची निवड शिरूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभागृह येथे जाहीर करण्यात आली,
राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष सुनील भंडारे यांनी स्वतः सर्व निवडी जाहीर केल्या त्या पुढील प्रमाणे:- एकनाथ थोरात (अध्यक्ष),बाळासाहेब जाधव (उपाध्यक्ष),आकाश वडघुले (सचिव), भरत घावटे (कार्याध्यक्ष),शुभम वाकचौरे (संपर्क प्रमुख),संदीप ढाकुलकर(संघटक),अल्लाउद्दीन अलवी (सहसंघटक)वैभव पवार(कोषाध्यक्ष) जयवंत पडवळ(सहकोषाध्यक्ष),सुनील जिते (समन्वयक), विनायक साबळे (संचालक),जिजाबाई थिटे(प्रमुख कार्यकारी समिती)दत्तात्रय कर्डिले(संचालक), सुनिल काटे (संचालक),शरद रासकर (संचालक),विजय ढमढेरे (संचालक)अशा निवडी जाहिरात करण्यात आले असून, राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर शिरूर तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे,
कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.यावेळी शिरूर तालुका पंचायत समितीचे सदस्य आबासाहेब सरोदे, सरदवाडीचे उपसरपंच गणेश सरोदे,माजी उपसरपंच कांतीलाल घावटे,राज्य मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय थोरात,हवेली तालुकाध्यक्ष पोपटराव मांजरे व तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते उपस्थित होते.
या प्रसंगी अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन झाले,
राजेंद्रदादा गावडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.पत्रकारितेच्या माध्यमातून समाजावर अन्याय घडत असल्यावर वाचा फोडण्याचे काम निश्चितच केले जाते.संघटन मजबूत असेल तर अशक्य गोष्टी शक्य करण्याचे काम करत आहे.
नवनिर्वाचित कार्यकारणीचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.आबासाहेब सरोदे म्हणाले की,संघटनेत काम करत असताना प्रत्येकाने प्रोटोकॉल पाळावा,तसेच पद हे फक्त नामधारी नसून एक जबाबदारी आहे, प्रत्येकाने संघटना वाढीसाठी प्रयत्न करायचे आहे असेही त्यांनी पुढे सांगितले,
पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील भंडारे यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यातील पत्रकारांच्या अडचणी पाहता केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पत्रकार विजयराव लोखंडे यांच्या सहकार्यातून चार वर्षांपूर्वी राज्य मराठी पत्रकार परिषदेचे एक छोटेशे रोपटे लावले होते, त्याचा आता वटवृक्ष झाला असून राज्य मराठी पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी नेहमी प्रयत्नशील राहील.पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय थोरात म्हणाले,या संघटनेचे जिल्हाभर लवकरच संघटन मजबूत केले जाणार आहे.शिरूर तालुक्याच्या कार्यकारणीचे कौतुक केले.येणाऱ्या काळात पत्रकार संघटनेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम साजरे केले जाणार आहेत.शिरूर तालुका अध्यक्ष एकनाथ थोरात म्हणाले की,संघटन मजबूत करून लोकांच्या न्याय व हक्कासाठी लढत राहणार आहे,जिथे कोठे गरिबावर अन्याय होत असेल तर संघटनेच्या माध्यमातून निश्चितच न्याय दिलाच जाईल.पत्रकारावर कोणत्याही प्रकारचे खोटे नाटे आरोप केल्यास कदापि सहन करणार नाही.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश वडघुले यांनी तर संघटनेचे उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी आभार मानले.