ज्येष्ठ नागरिकांचा उस्फुर्त सहभाग!
जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
ओतूर ता:-जुन्नर येथे मोतीबिंदू मुक्त जुन्नर अभियानाअंतर्गत डिसेंट फाऊंडेशन व सारथ्य फाऊंडेशन जुन्नर (पुणे) यांचे संयुक्त विद्यमाने आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल,पनवेल,मुंबई यांचे मार्फत ओतूर येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन पुरुष ज्येष्ठ नागरिक संघ व मुक्ताई महिला ज्येष्ठ नागरिक संघ,ओतूर यांचे सहकार्याने सोमवार दिनांक २०/११/२०२३ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत जीवन शिक्षण मंदिर,ओतूर नं.२ येथे आयोजित करण्यात आले होते.त्यास ओतूर व परिसरातील ज्येष्ठ महिला व पुरुष वर्गाकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण २२९ महिला व पुरुषांनी नेत्र तपासणी करुन घेतली,तर ३१ महिला व पुरुषांना शस्रक्रियेसाठी पनवेल येथे पाठविण्यात आले. आजच्या शिबिराला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. डिसेंट फाऊंडेशन व सारथ्य फाऊंडेशन जुन्नर(पुणे) तसेच दोन्ही ज्येष्ठ नागरिक संघाचे कामाचे जनतेकडून फार कौतुक होत आहे. शिबिराचे उदघाटन माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले,सरपंच छाया तांबे,उपसरपंच प्रशांत डुंबरे व हॉस्पिटल चे प्रतिनिधी प्रकाश पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.शिबीर यशस्वी करण्यासाठी डिसेंट फाऊंडेशनचे व लेण्याद्री देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई,सचिव फकीर आतार,आदिनाथचव्हाण, यश मस्करे,व त्यांचे सर्व सहकारी तसेच सारथ्य फाऊंडेशन जुन्नर(पुणे)चे अध्यक्ष तुषार ढोमसे,शिरीष डुंबरे,अवधूत शिंगोटे,ओमकार रसाळे, प्रमोद बोडके, निलेश वारुळे, अक्षय गावडे व त्यांचे सर्व सहकारी तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेव ओतूरकर व सर्व संचालक मुक्ताई महिला संघाचे अध्यक्ष श्रीमती सुनंदा डुंबरे व त्यांचे सर्व संचालिका यांनी अथक परिश्रम घेतले.अशा शिबिरांची ग्रामीण भागात खूप आवश्यकता असल्याची माहिती ज्येष्ठ नागरिकांनी बोलून दाखविली.