शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार

राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कंत्राटी कर्मचारी व अधिकारी यांच्या शासनातील सामायोजन होई पर्यंत सामान काम समान वेतन या मागणी साठी मागील २५ऑक्टोबर पासून बेमुदत काम बंद आंदोलनात उतरले आहेत, त्यामुळे दि.२५/१०/२०२३ रोजी कुटुंब कल्याण आयुक्त धीरज कुमार यांनी कृती समिती सोबत बैठक घेतली व त्यामध्ये असा निर्णय घेतला राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांना शासन सेवेत समायोजित करणे बाबत सविस्तर फेर प्रस्ताव इतर

राज्याप्रमाणे व निर्णयाचा अभ्यास करून शासनास तत्काळ सादर करणे बाबत निर्णय घेण्यात आला. परतू समायोजन कृती समितीमधील विविध संघटनानाचे त्यावर समाधान न झाल्यामुळे काम बंद आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाच्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था संपूर्णतः कोलमंडलेली आहे,महानगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून उतरलेले आहेत.या आंदोलनाचा एक भाग म्हणून दि. ३० व ३१ रोजी मुंबईत आझाद मैदान येथे दहा हजार कर्मचार्यानी एकत्रित येऊन शाशनाच्या विरोधात आक्रोश आंदोलनात सहभागी झाले होते. त्यानुसार दि.३१ रोजी राज्याचे आरोग्य मंत्री मा.ना.तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली समायोजन कृती समितीतील संघटनेसोबत आंदोलनाच्या पार्शभूमीवर बैठक घेतली या बैठकीला आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव मा.मिलिंद म्हैसकर, आरोग्य विभागाचे आयुक्त तथा अभियान संचालक धीरज कुमार व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी राष्टीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत असणा-या कंत्राटी कर्मचार्यांना वयाची अट शिथिल करून आरोग्य विभागातील रिक्त जागे पैकी ३० टक्के जागा एनएचएम कर्मचार-यासाठी राखीव ठेवून त्यांचे टप्याटप्याने सामायोजन करण्यात येईल व येणाऱ्या कॅबिनेट पुढे हा विषय ठेवण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले परंतू समायोजन कृती समितीतील संघटनांचे त्यावर समाधान न झाल्यामुळे काम बंद आंदोलन पुढे चालू ठेवण्याचा निर्णय सर्व संघटनेनी घेतला बैठकीत दिलेले आश्वासन मा.आरोग्य मंत्री यांनी आझाद मैदानाच्या आंदोलन स्थळी येऊन सर्व कर्मचा-या पुढे सांगण्याचे आव्हान कृती समिने केले त्यानुसार दि. ३१ रोजी मा.आरोग्य मंत्री यांनी आंदोलन स्थळी घेतलेला निर्णय सर्व कर्मचार-यासमोर सांगितला परंतू कर्मचारी आणि संघटना समायोजन होई पर्यंत सामान काम समान वेतन या मागणीवर ठाम राहिले व पुढे काम बंद आंदोलन चालू ठेवण्याचे ठरले त्यानुसार पुणे जिल्ह्रातील ग्रामीण भागातील ७५०समुदाय आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी १९५० नर्सेस,औषध निर्माण अधिकारी,प्रयोग शाळा तंत्रज्ञ व तालुका स्तरीय व जिल्हा स्तरीय अधिकारी असे एकूण २७५० ग्रामीण भागातील आणि पुणे महानगर पालिकेतील व पिंपरी महानगर पालिकेतील १४०० कर्मचारी अधिकारी ह्या कामबंद आंदोलनांत उतरलेले आहेत. तसेच दि.०६/११/२०२३ रोजी जिल्हा परिषद पुणेच्या समोर सर्व कर्मचारी मिळून काम बंद आंदोलनात शासनाला जाग येण्यासाठी जागरण गोंधळ घातले. यामध्ये हजारो अधिकारी कर्मचारी उपस्तितीत होते. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक २०/११/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद पुणे येथून जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आक्रोश मोर्चा काढण्यात आला त्यावेळी आम्ही समुदाय अधिकारी,नर्सस,औषधनिर्माण अधिकारी,प्रयोगशाळा तंत्रज्ञ इत्यादी सेवा देत असताना जे साहित्य (डॉक्टर, नर्सेस, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन यांचे साहित्य Instruments स्टेथोस्कोप, sethoscope बीपी अप्परटस, मिटर थर्मामिटर, सुगर मिटर,थर्मल गण SPO2 Meter, ओटोस्कोप) रस्त्यावर मांडून आंदोलन करण्यात आले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button