डिसेंट फाउंडेशनचा अत्यंत स्तुत्य उपक्रम
जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
जुन्नर तालुक्यातील गरीब,वंचित गरजूंसाठी सामाजिक उपक्रम राबवणारी डिसेंट फाउंडेशन ही एक अग्रगण्य संस्था असून गेल्या दोन वर्षांपासून एक साडी “ती” च्यासाठी ह्या उपक्रमांतर्गत आदिवासी डोंगराळ भागातील गोरगरीब,आदिवासी निराधार, वंचित कुटुंबातील महिलांना साडी व दिवाळी फराळ वाटप करत आहे.डिसेंट फाउंडेशन ने साड्यांसाठी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत ग्रामीण भागासह पुणे,मुंबई व नाशिक यांसारख्या शहरी भागातून यावर्षी जवळपास आठ हजार साड्यांचे संकलन झाले.
फाउंडेशनच्या संचालक,सदस्य व दानशूर व्यक्ती यांनी दिवाळी फराळासाठी आर्थिक मदत केली. त्यातूनच आठ हजार साड्या व दोन हजार मिठाईच्या पुड्यांचे आदिवासी डोंगराळ भागात राहणाऱ्या गोर- गरीब व गरजू कुटुंबांना वाटप करण्यात आले.त्यामध्ये ऊस तोडणी कामगार, वीट भट्टी कामगार,कातकरी ठाकर व आदिवासी समाजातील कुटुंबांतीलमहिलांचा समावेश आहे. या उपक्रमासाठी समाजातील दानशूर व्यक्तीं सोबतच जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन,आरोग्य विभाग पंचायत समिती जुन्नर , इनरव्हील क्लब ऑफ नारायणगाव,इनरव्हील क्लब ऑफ मंचर,हिरकणी सेवा प्रतिष्ठान राजुरी,श्री स्वामी समर्थ सेवेकरी केंद्र जुन्नर,मंचर,चाकण व भोसरी, जिजाऊ सखी मंच आळेफाटा, सारथ्य फाउंडेशन ओतूर,श्री स्वामी समर्थ ढोल ताशा पथक गोळेगाव व श्रीराम महिला लेझीम पथक शिरोली अशा विविध संस्थांनी देखील मोठ्या प्रमाणात मदत केली अशी माहिती संस्थेचे संस्थापक जितेंद्र बिडवई व सचिव फकीर आतार यांनी दिली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र बिडवई,उपाध्यक्ष योगेश धर्मे,संचालक आदिनाथ चव्हाण,योगेश चौरे,जीवन हीलम आदिनी कष्ट घेतले.