प्रतिनिधी : शकील मनियार

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच अमित साहेब ठाकरे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना सचिन भाऊ गोळे यांच्या मार्गदर्शना खाली महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी श्री संजय सोमाजी देवकर यांची निवड करण्यात आली ह्या पुर्वी श्री संजय सोमाजी देवकर ह्यानी महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना अध्यक्ष मुळशी तालुका पद देण्यात आल होत त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सचिन भाऊ गोळे यांच्या मार्गदर्शना खाली पद देण्यात आले त्या वेळी पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबार तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष आप्पा दसवडकर मुळशी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष धनंजय टेमघीरे उपाध्यक्ष गणेश शिंदे मा तालुका अध्यक्ष गणेश जोरी तसेच अध्यक्ष विद्यार्थीसेना मुळशी तालुका अनिल मातेरे महेश राजीवडे श्रीकांत मातेरे निखील गुडंगळ विशाल वाल रोहीत माने अजय ढवळे उपस्थित होते यावेळी संजय देवकर यांनी सांगितले की माथाडी कामगारांना माननीय राज साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे हक्क विविध प्रश्न अनेक अडचणी व इतर समस्या सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच माथाडी कामगार सेनेच्या सर्वांना सोबत घेऊन पक्षाचे ध्येय धोरण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम करेल व पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्याची काम करणार आहे राज साहेबांनी माझ्यावरती जबाबदारी दिली जो विश्वास दाखवला आहे तो योग्य व सार्थ ठरवणार आहे माथाडी कामगार सेनेच्या सर्व कामगार वर्गांना सोबत घेऊन भविष्यकाळामध्ये ज्या अडचण असेल ते सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.या निवडीबद्दल त्यांचे सर्वञ कौतुक व अभिनंदन होत आहे.
Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button