जिल्हा संघाला माहितीच नाही:-कांदा रोपांच्या विक्रीतून येणारे उत्पन्न कोणाला?:-व्यवस्थापकानेच केली कांदा रोप लागवड.
जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ कात्रज डेअरी संचालित ओतूर ता:- जुन्नर येथील ओतूर दूध शीतकरण केंद्राच्या सुमारे दोन एकर क्षेत्रात केंद्रप्रमुख सी. एस. लामखडे यांनी संघाची कोणतीही परवानगी न घेता परस्पर पैसे मिळवून देणारे नगदी पीक कांदा रोपांची लागवड केली आहे. या कांदा रोप विक्रीनंतर होणारे रोख स्वरूपातील उत्पन्न नक्की कोणाला?असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.याबाबत संघाकडून सखोल चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे. ओतूर दूध शीतकरण केंद्राचे एकूण क्षेत्र अंदाजे पावणेचार एकर आहे.यापैकी दीड एकर क्षेत्रात शीत केंद्राची इमारत असून,इमारतीच्या मागील बाजूस सुमारे दोन एकर क्षेत्रात आंब्याची बाग आहे.या बागेत कांदा रोपांची गुपचूप लागवड करण्यात आली आहे.शीतकरण केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यां सोबत संवाद साधला असता,त्यांनी लागवड केंद्र व्यवस्थापक यांनीच केली असल्याचे सांगितले.:- या लागवडीबाबत व्यवस्थापक दोषी असेल, तर योग्य ती कारवाई करण्यात येईल. (भाऊ देवाडे, उपाध्यक्ष, कात्रज दूध संघ) :- या गुपचूप कांदा रोप लागवडीसाठी आम्ही कोणतीही परवानगी दिलेली नाही. (भगवान पासलकर, अध्यक्ष,कात्रज दूध संघ):-तब्बल दोन एकर जागा फक्त निर्मळ राहावी, यासाठी मी इतक्या मोठ्या प्रमाणात कांदा रोप लागवड केली आहे.:- (सी. एस.लामखडे,व्यवस्थापक,शीतकरण केंद्र, ओतूर)