निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार
स्वाभिमानी मराठा महासंघ मराठा समाजाला एकत्र करून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेली संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून मराठा समाजातील शेतकरी , तरूण, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटना प्रयत्न करत आहे याच धर्तीवर स्वाभिमानी मराठा महासंघ शिरूर-हवेली तालुका समन्वयक पदी ज्ञानेश्वर गायकवाड. यांची नियुक्ती करण्यात आली आहे निवडिचे पत्र नुकतेच राष्ट्रीय उपाध्यक्ष निलेश धुमाळ पाटील व महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा अनिता पाटील यांच्या शिफारशी नुसार संघटनेचे संस्थापक डॉ कृषिराज टकले पाटील यांनी दिलेज्ञानेश्वर गायकवाड.यांनी निवडी प्रसंगी सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण महत्वाचे आहे.ज्ञानेश्वर गायकवाड. यांच्या निवडीचे स्वागत राष्ट्रीय अध्यक्ष मराठा रामनारायण, राष्ट्रीय उपाध्यक्ष निलेश धुमाळ पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस राजबीर सिंह, राष्ट्रीय चिटणीस सलील सुर्यवंशी , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गौरव पवार, प्रदेश कार्याध्यक्ष दिपक दादा पवार, प्रदेश उपाध्यक्ष गणेश शिंदे, राज्य निरिक्षक अंकुश डांभे, शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुभाष गागरे,प्रदेश सरचिटणीस डॉ प्रशांत गडाख, महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा अनिता पाटील, उपाध्यक्ष मायाताई देशमुख, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनंत पोळ,पुणे जिल्हा अध्यक्ष देवदत्त पोखरकर, शिरूर हवेली तालुका अध्यक्ष शितल गाजरे, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष शिवशंभू प्रिया जांभळे, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख श्री.ज्योतिबा गुंड , श्री.श्रीकांत हारदे पाटील शिरूर तालुका- संपर्क प्रमुख आदिंनी केले आहे.