प्रतिनिधी : सचिन थोरवे
ओतूर येथील श्रद्धा शांताराम घोलप ही आपल्या राहत्या घरात झोपली असताना रात्रीच्या वेळी साधारणतः एकच्या दरम्यान या मुलीच्या पायाला विषारी सर्पदंश झाल्याचे तिच्या कुटुंबीयांना कळाले त्यांनी लगेचच नारायणगाव येथील महाराष्ट्रात सर्पदंशासाठी उपचार करणारे प्रसिद्ध डॉक्टर सदानंद राऊत यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले परंतु त्या ठिकाणी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी आर्थिक मदतीची गरज असल्याचे जुन्नर आंबेगाव इलेक्ट्रिक फिटर संघटनेच्या बाळासाहेब वायकर यांना कळाली व त्यांनी संघटनेच्या सभासदांना मदत करण्याचे आवाहन केले असता संस्थेचे अध्यक्ष संदीप जाधव खजिनदार सुनील वाणी आणि सभासद बाळासाहेब वायकर राजू चौरे शंकर शेटे पांडूशेठ प्रधान यांनी तात्काळ मुलीचा जीव वाचला पाहिजे या दृष्टीने लगेचच ने शांताराम घोलप यांच्या खात्यावरती 25 हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केल्याचे संस्थेचे सभासद अजित भास्कर यांनी सांगितले आणि सामाजिक बांधिलकी जपली.