जुन्नर प्रतिनिधी : सचिन थोरवे
नारायणगाव तालुका जुन्नर या ठिकाणी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड या प्रतिष्ठानच्या वतीने नारायणगाव वारूळवाडी पिंपळवंडी तेजेवाडी उदापूर येणेंरे या ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत श्री सदस्य यांनी निर्माल्य संकलन केले त्यामध्ये नारायणगाव आणि वारूळवाडी या ठिकाणी किमान दहा टन निर्माल्य संकलन झाले असून हे निर्माल्य नदीपात्रात येथून पाठीमागे टाकले जात होते आणि त्यामुळे पाणी प्रदूषित होऊन मानवी जीवनावर त्याचा दुष्परिणाम होत होता आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होत असे आणि पर्यावरणाचा ही ऱ्हास होत होता हे सर्व होऊ नये आणि जल प्रदूषण होऊ नये यासाठी डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून निर्मल्य संकलनाचा स्तुत्य असा उपक्रम अखंड महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून जमा केलेल्या निर्माल्यातून कंपोस्ट खत तयार करावे असा मानस आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा असून तयार झालेले कंपोस्ट खत हे प्रतिष्ठानने ज्या ज्या ठिकाणी वृक्ष लागवड केलेली आहे त्या वृक्षांना वापरण्यात येणार आहे त्यामुळे वृक्ष जोमाने वाढून पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी उपयोग होणार आहे या उपक्रमासाठी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे चाळीस सदस्य स्वयंस्फूर्तीने उपस्थित होते.