गोलेगाव प्रतिनिधी :चेतन पडवळ
गोलेगाव ता. शिरूर परिसरात मुसळधार पावसाने चांगलीच हजेरी लावली. गेल्या चार दिवसापासून रात्रभर व दिवसभरात झालेल्या पावसामुळे ओढे नाले ओसडून वाहत होते. वाड्या वस्त्यांवर शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

तसेच गावचे ग्रामदैवत असणारे दावलमलिक बाबा येथील गावतळे पाण्याने तुडुंब भरून आहे. वादळामुळे अनेक ठिकाणी विद्युत खांब पडल्याने काही वस्त्यांवर दोन ते तीन दिवसापासुन विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तरडोबाचीवाडी येथील अस्फा कंपनी शेजारी असणारे विद्युत रोहित्र तारासहित खाली कोसळले.शिरूर गोलेगाव मार्गावर पुलावरून पाणी वाहिले