प्रतिनिधी : जिजाबाई थिटे

विकसित भारतासाठी सर्वंकष प्रयत्न आवश्यक असल्याचे मत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० क्षमता वृद्धी प्रशिक्षण समारोपप्रसंगी डॉ.समीर ओंकार यांनी व्यक्त केले.शिरूरचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांच्या नियोजनाने सुरू असलेल्या या प्रशिक्षण वर्गाच्या कार्यक्रमाला शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव प्राचार्य मारुती कदम,डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रशिक्षण वर्गाचे प्रमुख शहाजीराजे पवार,पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना टीडीएफचे जिल्हाध्यक्ष प्रा. जितेंद्रकुमार थिटे,प्राचार्य तुकाराम शिरसाठ,सुलभक अर्जुनराव पांढरकर,अशोक कर्डिले,आदिनाथ कर्डिले, शशिकांत बढे,प्राची कुलकर्णी,गणेश बांगर,बबनराव गुंड,चंद्रशेखर काकडे,डी.एम.आढळ,मुख्याध्यापक राजेंद्र ढवळे,बाळासाहेब चव्हाण,शहाजी भोस, राजू घोडके,कैलास गिरमकर,नामदेव चौधरी,मदन दिवे,प्रकाश गावडे,अविनाश क्षीरसागर,सुदाम पिंगळे उपस्थित होते.

प्रशिक्षण कालावधी दरम्यान जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.नामदेव शेंडकर,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अहिल्यानगरच्या सांख्यिकी विभागाचे नितीन टिळेकर,पंचायत समिती शिरूरचे शिक्षण विस्तार अधिकारी किसनराव खोडदे,शिक्षण विस्तार अधिकारी वंदना शिंदे,शिक्षण विस्तार अधिकारी काळूराम चकोर,मंगेश पावडे,प्रदीपदादा देवकाते, संदीप क्षीरसागर,नागोराव चाटे,संतोष गावडे,बेबी तोडमल यांनी भेटी दिल्या.डॉ.समीर ओंकार पुढे म्हणाले की रोजगारक्षम क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.प्रशिक्षणार्थीच्या वतीने प्राचार्य मारुती कदम,रेश्मा शेख व गणेश बांगर यांनी मनोगते व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहाजीराजे पवार,प्रास्ताविक अर्जुनराव पांढरकर तर आभार प्रा. जितेंद्रकुमार थिटे यांनी मानले

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button