प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
नवीन शैक्षणिक धोरण -२०२०च्या अनुषंगाने जागतिक स्तरावर होणाऱ्या आमुलाग्र बदलांचा विचार करता शिक्षण क्षेत्रातील नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक यांना सक्षम करणे आवश्यक आहे.

शिक्षणाची धोरणे,अध्ययन-अध्यापन,मूल्यमापन यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर अपेक्षित आहे त्यादृष्टीने ज्ञान आणि कौशल्य तसेच क्षमता विकसन याबाबत शिक्षकांना अधिकाधिक प्रशिक्षित करणे गरजेचे असल्याचे मत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणेचे प्राचार्य डॉ.नामदेव शेंडकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाच्या शिरूर तालुक्यातील प्रशिक्षणवर्ग भेटीच्या निमित्ताने व्यक्त केले शिरूरचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांच्या नियोजनाने सुरू असलेल्या या प्रशिक्षणाच्या पाचव्या टप्प्यात विविध विद्यालयाचे प्राचार्य,मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख,विषयतज्ज्ञ, विशेष साधनव्यक्ती,पदवीधर शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अहिल्यानगरचे सांख्यिकी विभागाचे नितीन टिळेकर,पुणे डायटचे मंगेश पावडे, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके,डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या प्रशिक्षण वर्गाचे प्रमुख शहाजीराजे पवार,पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष प्राचार्य रामदास थिटे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे प्राचार्य डॉ.समीर ओंकार,पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना टीडीएफचे जिल्हाध्यक्ष प्रा.जितेंद्रकुमार थिटे,अशोकराव कर्डिले,अर्जुनराव पांढरकर,प्रा गणेश बांगर,बबनराव गुंड,आदिनाथ कर्डिले,डी.एम.आढळ,चंद्रकांत काकडे,प्राची कुलकर्णी उपस्थित होते. डॉ.शेंडकर पुढे म्हणाले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये तसेच पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यामध्ये सुरू आहे शिक्षक सक्षमीकरण करून २०२० चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबवणे हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे या निमित्ताने प्रशिक्षणार्थींना डॉ.शेंडकर यांनी शुभेच्छा दिल्या सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार प्राचार्य रामदास थिटे यांनी मानले.