शुभम वाकचौरे
शिरूर : वाडा कॉलनी येथील नागरिकांना अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती.नगरपरिषदेने पाणी पुरवठा करणारी मुख्य लाईन शेवटपर्यंत नेलीच नव्हती त्यामुळे अनेक महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.शेवटी वाडा कॉलनी च्या महिलांनी बहुजन मुक्ती पार्टी शिरूर शहर अध्यक्ष समाधान लोंढे यांना संपर्क करून ही समस्या सोडविण्यासाठी विनंती केली असता बहुजन मुक्ती पार्टी शिरूर शहर अध्यक्ष समाधान लोंढे, सचिव सागर घोलप, संघटक अशोक गुळादे यांनी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मा.फिरोजभाई सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली वाडा कॉलनी येथील महिलांचा दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी भव्य हंडा मोर्चा काढणार असले बाबतचे निवेदन शिरूर नगरपरिषदेला दिले होते.
शिरूर नगरपरिषदेने बहुजन मुक्ती पार्टी च्या आंदोलनाचा धसका घेऊन तिन दिवस आधीच आज दि. 27 सप्टेंबर रोजी वाडा कॉलनी येथील मुख्य पाईपलाईन चे एक्स्टेंशन चे कामाला सुरुवात केली आहे. यावेळी स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग प्रमुख मा. आदित्य बनकर आणि इतर कर्मचारी उपस्थित होतवाडा कॉलनी च्या महिलांनी आणि सर्व नागरिकांनी बहुजन मुक्ती पार्टी चे आभार व्यक्त केले आहे.
यावेळी शिरूर नगरपरिषदेचे स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग प्रमुख मा. आदित्य बनकर आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.