टाकळी हाजी: प्रतिनिधी

पुणे जिल्हा क्रिडा परीषद अंतर्गत शिरूर तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत मा.बापुसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्य विद्यालय टाकळी हाजीचा विद्यार्थी पैलवान अजिंक्य अशोक चोरे याची (१७ वयोगट) ६० किलो वजनी गटात पुणे जिल्ह्यासाठी निवड झाली आहे.

न्हावरा या ठिकाणी शिरूर तालुक्यातील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती.या झालेल्या अटीतटीच्या लढतीत पैलवान अजिंक्य चोरे याने यश मिळवले आहे.त्याला यशाची गुरुकिल्ली मामा पैलवान स्वप्निल म्हतू गावडे यांच्याकडून मिळालेली आहे.गावडे विद्यालयाचे नाव तालुक्यात झळकविले आहे त्याबद्दल विद्यालयाचे आदर्श प्राचार्य आर.बी.गावडे सर यांनी अभिनंदन केले आहे, जिल्ह्यात देखील त्याची नक्कीच निवड होईल असा आत्मविश्वास देखील प्राचार्य गावडे यांनी दाखविला आहे.त्याच्या या यशाबद्दल विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव गावडे,संस्थेचे सचिव राजेंद्र गावडे,सहसचिव सूनीताताई गावडे,व्यवस्थापकीय संचालक अजित गावडे सर,शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी देखील पैलवान चोरे याचे अभिनंदन केले आहे.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button