जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
मौजे ओतूर पाथरटवाडी गुरवठिके येथील सुटुंबे टेकडी लगत गुरुवार दिनांक:- २५जुलै रोजी रात्री ८:१५ वाजण्याच्या दरम्यान मोटारसायकलने ओतूर वरून पाथरटवाडीला जात असताना सुरेश राजेंद्र सावंत वय २३ व सुरज राजेंद्र पानसरे वय १९ वर्षे यांच्यावर रस्ता ओलांडत असताना बिबटयाने हल्ला केला त्यात दोघेही जखमी झाले आहेत.

त्यांना वनविभाग जुन्नरवनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल ओतूर सुधाकर गिते वनरक्षक ओतूर विश्वनाथ बेले वनसेवक फुलचंद खंडागळे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र ओतुर येथे नेऊन उपचार करून पुढील उपचारासाठी आरोग्य केंद्र नारायणगाव येथे नेऊन उपचार करून घरी सोडण्यात आले.याकामी पोपट मालकर,संपत घुले,विशाल घुले,मनोज सावंत, मयुर मालकर,अजय मालकर, नामदेव शेटे,सुधाकर घुले, माऊली पाथरट यांनी सहकार्य केले सदर परिसरात वनविभागाने पिंजरे लावन्यात आले आहेत .

यावेळी ग्रामस्थांना वनविभाग जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर यांच्याकडून आवाहन करण्यात येते की आपण बिबट प्रवण क्षेत्रात राहत असून सध्या पावसाळा सुरू झाल्याने बिबट रस्त्याच्या कडेला, कोरड्या जागी दबा धरून बसण्याची शक्यता असते यामुळे आपण सुरक्षितता बाळगणे आवश्यक आहे,रात्री अपरात्री एकटे फिरु नये ,आपल्या घराभोवती दिवे लावावेत,आपलं पशुधन गोठे बंदिस्त ठेवण्यात यावेत, लहान मुलांनी शाळेत जाताना समुहाने जावे, पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी आपल्या परीसरातील रस्ते झुडपे मुक्त असावेत असे आवाहन वनविभाग जुन्नर कडुन करण्यात आले.