जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
उदापुर ता;-जुन्नर येथील लोकांचे आरोग्य धोक्यात या सदराखाली शिरूर-महाराष्ट्र न्यूजमध्ये गुरुवार दि:-२३ मे रोजी जीबीएस या विचित्र आजारासह डेंग्यू आणि टायफॉईड या आजारांनी थैमान घालण्यास सुरुवात केली असून ग्रामपंचायत उदापुर व प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूर अधिकारी व कर्मचारी यांच्या लक्षात आणून दिली व तातडीने उपाय योजना करावी अशी सूचना ग्रामस्थांच्या वतीने मांडली होती.
या बातमीचा परिणाम म्हणून ग्रामपंचायत उदापुरच्या वतीने धुराच्या यंत्राद्वारे औषध वापरून धुराची फवारणी करण्यास सुरुवात केली असून आरोग्य विभागाने देखील घर ते घर सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे.यावेळी जीबीएस चे तीन ,टायफॉईड चे पाच आणि डेंग्यू या आजाराचे वीस रुग्ण आणि आजपर्यंत आणखी त्यात दहा ते बारा रुग्णांची वाढ झालेली आहे त्यामुळे उदापुर आणि परिसरात डेंग्यूची साथ आली असावी असे मेसेज गावात फिरण्यास सुरू झालेली असताना ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने काळजीपूर्वक घेतलेली प्रतिबंधात्मक उपाय योजना ही साथ थोपविण्यास उपयोगी पडेल असे वाटते.
:–धुराची फवारणी केंव्हा करावी ? जिबीएस हा कोरोना नंतर आलेला नवीन विषाणूजन्य आजार आहे तर टायफॉईड हा आजार दूषित,शिळे व उघड्यावरील अन्न पदार्थांचे सेवन केल्यास होतात त्यामुळे याबाबत जनजागृती करून काळजी घेण्यास सांगितले जाते मात्र औषधी धूर फवारणीचा याआजारांशी कोणताही संबंध नाही.मात्र डेंग्यू हा आजार डास किंवा मच्छर चावल्याने होतो मात्र हे खास डास असतात आणि दिवसाच उजेडात चावा घेतात विशेषतः हे डास घुडघ्यांच्या खालीच चावतात कारण त्यांना त्याच्यावर उडणे शक्य नसते. त्यामुळे या डासांचा बंदोबस्त करण्यासाठी फवारणी दिवसाच उजेडातच होणे व संपूर्ण गावात परिसरात सलग वेळेत होणे आवश्यक आहे असे तज्ञांचे मत आहे. मात्र ग्रामपंचायत कडून होणारी ही फवारणी संध्याकाळी सहा नंतर सुरू केली जाते व एक दोन गल्लीत फवारणी केली की यंत्रात बिघाड होणे,बॅटरी डिस्चार्ज होणे किंवा डिझेल म्हणजे इंधन संपणे अशा तक्रारी निर्माण होतात महत्वाचे म्हणजे या फवारणी साठी कोणते औषध वापरले जाते त्याचे नाव काय? हे कर्मचारी वर्गाला सांगता येत नाही शिवाय अंधारात फवारणी झाल्याने डास घरातील निवांत जागी जाऊन आरामात बसतात फवारणी तर रस्त्यावर होते परिणामी या फवारणीचा काही उपयोग होत असेल असे वाटत नाही ?