शुभम वाकचौरे
जांबूत: जांबुत येथील डॉ. गायकवाड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल द्वितीय वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अनेक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत नाहीत.या हेतूने डॉ. गायकवाड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जांबुत च्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराची वैशिष्ट्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत डायबिटीस तपासणी,मासिक पाळीतील तक्रारी,हार्मोनल असंतुलन, डायबिटिस – मनके व गुडघ्याचे आजार आयुर्वेद व पंचकर्म,रक्त, लघवी तपासणी या सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या.डॉ. पियुष विश्वनाथ गायकवाड MS Orthopedics,डॉ. प्रियांका विश्वनाथ गायकवाडMD Medicine, यांनी यापूर्वी अनेक आरोग्य शिबिरे ग्रामीण भागात यशस्वीपणे घेऊन गरजूंना त्याचा लाभ मिळवून दिला आहे.दरम्यान, मंगळवारी झालेल्या मोफत आरोग्य शिबिराने अनेकांना दिलासा मिळाला.निरोगी आरोग्य जगण्यासाठी सतत आरोग्य तपासणी, व फॅमिली डॉक्टरशी सल्ला मसलत आवश्यक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
अशा प्रकारचे आरोग्य शिबीर सात्यताने आयोजित करण्यात येतील असे आयोजकांमार्फत आश्वासित करण्यात आले. डॉ. गायकवाड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जांबुत च्या वतीने अनेक गरजू लोकांना गरम चादरी चे वाटप करण्यात आले. सर्व रुग्णांना मोफत नाष्ट्याचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी विश्वनाथ गायकवाड, डॉ प्रियांका गायकवाड,सरपंच दत्तात्रय जोरी, माजी सरपंच बाळूशेठ फिरोदिया, माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी,माजी सरपंच बाबाशेठ फिरोदिया ,चेअरमन बाळासाहेब पठारे,ग्रामपंचायत सदस्य राहुल जगताप ,ग्रामपंचायत सदस्य गोरक्ष गाजरे ,ग्रामपंचायत सदस्य सुभाष जगताप, पोपट फिरोदिया, युवराज पळसकर, चंद्रकांत थोरात,मधुकर बोऱ्हाडे, गणेश गायकवाड,संदिप गायकवाड, दत्ता आतकर आदी मान्यवर उपस्थित होते.