जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
डिंगोरे ता:-जुन्नर येथील गावच्या माहेरवाशिनी ग्रुपने गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अनोखा उपक्रम केला.सोमवार दिनांक १८ डिसें रोजी आपल्या माहेरातील वृद्ध व्यक्ती ग्रामदैवत मुक्तादेवी मंदिरात दर्शनाला जातात तेव्हा त्यांना विसावा घेण्यासाठी कायमचे दोन बेंच दिले. तसेच दशक्रिया विधी ठिकाणी बसण्यासाठी दोन बेंच दिले. या उपक्रमाचा शुभारंभ रंजना महादेव आमले आजी यांच्या हस्ते झाले.यावेळी सरपंच सीमा सोनवणे उपस्थित होत्या त्यांनी माहेरवाशिनिंचे विशेष आभार मानले.सदर बेच उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी पल्लवी वामन ,प्रेमलता ठीकेकर,अरुणा उकिर्डे,रंजना सुकाळे,प्राजक्ता लोहोटे,अश्विनी उकिर्डे,प्राजक्ता लोहोटे,अश्विनी लोहोटे,प्रणाली आमले,निलोफर पठाण या माहेरवाशिनी उपस्थित होत्या.या उपक्रमात सर्व माहेरवाशिनींनी आर्थिक योगदान दिले. या ग्रुपने एक आदर्श उभा केला आहे.गावातुन पंचक्रोशीतुन,सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.