पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई!
शुभम वाकचौरे
शिरूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ११०४/२०२३ भा.दं.वि.का.क. ३०२,२०१ प्रमाणे दि. २९/१०/२०२३ रोजी गुन्हा दाखल करणेत आलेला होता. सदर गुन्हयातील मयत व्यक्तीची ओळख पटलेली नव्हती. त्यामुळे गुन्हयाची उकल करणे हे पोलीसां समोर मोठे आव्हान होते. मयत प्रेत हे न्हावरा केडगाव जाणारे रोडवरील पारगाव पुलाखाली भिमा नदीपात्रात मिळाल्याने नक्की गुन्हा केव्हा घडला. याबाबत संभ्रम निर्माण झाला.
सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरीता पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाला मार्गदर्शन व सुचना केल्या होत्या.या गुन्हयाचे अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तसेच तांत्रिक विश्लेषण करणेत आले. सलग आठ दिवस सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, त्या दरम्यान एक संशयित चारचाकी पिकअप वाहन निदर्शनास आले. सदरचे पिकअप वाहन हे सुपा टोल नाका बाजुकडे गेल्याचे आढळून आल्याने सुपा टोलनाका परीसरात चौकशी करता, मयत इसम हा टोलनाक्या जवळील हॉटेल सौंदर्या इन येथे कामास असल्याची माहिती मिळाली. हॉटेल सौंदर्या इन हे १) बापू भिमाजी तरटे वय ३६ वर्ष रा. पळवे खु ता. पारनेर जि अहमदनगर २) निलेश माणिक थोरात बघ २६ वर्षे, रा. मुंगशी, ता. पारनेर जि. अहमदनगर यांनी चालविण्यासाठी घेतलेले. असल्याने त्यांचेकडे चौकशी करण्यास सुरूवात केली असता. त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे प्रथम कबुल केले. मयत व्यक्तीचे नाव संतोष आप्पासाहेब गाडेकर रा. टोकवाड़ी ता मंठा जि जालना असे असल्याचे निष्पन्न झाले. मयत संतोष गाडेकर याने हॉटेलवर काम करण्यासाठी आगाऊ रक्कम घेतलेली होती. परंतु तो काम करत नसल्याने त्यास मारहाण करून त्याचा खून केला.आणि पिकअप वाहनातून त्यास पारगाव पुलावरून भिमा नदीपात्रात त्याचे मयत प्रेत टाकून देण्यात आले. असल्याचे निष्पन्न झाले. असून दोन्ही आरोपींना मयताची विल्हेवाट लावणेसाठी वापरणेत आलेले पिकअप वाहनासह शिरूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे , पुणे विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा , कडील पोलीस नाईक गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, अतुल डेरे, राजु मोमीण, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे यांनी केली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडी रिमांड मध्ये असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन करत आहे.