२२ हजार ५०० रु किमंतीची पाच हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली.
शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार
शिरुर येथील हॉटेल अंबिका मागील डोंगरावरील झाडाना पाणी देण्यासाठी ठेवण्यात आलेली २२ हजार ५०० रु किमंतीची पाच हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे .पुणे नगर महामार्गावर हॉटेल अंबिका मागील वनखात्याचा डोंगरावर सह्याद्री देवराई शिरुर येथे लोकसहभागातुन सिने अभिनेते सयाजी शिंदे यांच्या मागर्दर्शनाखालील सह्याद्री देवराई या संस्थेचा वतीने आंबा , चिंच , नारळ , आवळा , जांभूळ या फळझाडा खेरीज अन्य १००० हून आधिक झाडे लावून त्याचे जतन व संवर्धन केले जाते . या डोंगरावर झाडांचे मोठे बन उभे राहात आहे . लोकसहभागातुन या डोंगरावर झाडाना पाणी देण्यासाठी ठिंबक सिंचन यंत्रणा करण्यात आली असून या ठिंबक करीता दोन पाण्याचा टाक्या बसविण्यात आल्या आहेत .१० नोव्हेंबर रोजी सह्याद्री देवराई शिरुरचे स्वंयसेवक झाडांना पाणी देण्यासाठी देवराई येथे गेले असता त्या ठिकाणची प्लास्टो कंपनीची ५ हजार लिटरची २२ हजार ५०० रु किमंतीची पाण्याची टाकी चोरीस गेलेले आढळून आले यासंदर्भात अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहयाद्री देवराई शिरुरचे समन्वयक महिबूब सय्यद यांनी फिर्याद दिली आहे .
सह्याद्री देवराईचे प्रमुख सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी देवराई शिरुर येथील पाण्याची टाकी चोरीला गेलेल्या घटने बाबत चिंता व्यक्त करुन लोकसहभागातून लोकांसाठी सुरु असलेल्या उपक्रमामध्ये चोरी सारखी झालेल्या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली .झाडेचे जतन व संवर्धन करुन पर्यावरण संवर्धनाची आपणा सर्वांची जबाबदारी आहे . पाण्याची टाकी चोरीला गेल्या मुळे माणंसाची दिवाळी साजरी होत असताना पाण्या अभावी झाडांची मात्र होळी होईल अशी उदिग्न प्रतिक्रिया दिली .