जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर
दिवाळीची पहाट सांगीतिक कार्यक्रमाने खुलवण्याची पद्धत आज सर्वदूर रूढ झाली आहे. ९०च्या दशकात ही संकल्पना पहिल्यांदा रुजली,ती राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात. उत्साही आणि रसिक पुणेकरांनी या संकल्पनेला उदंड प्रतिसाद दिला मग विविध संस्थांमार्फत दिवाळी पहाट’चे आयोजन केले जाऊ लागले.राज्याच्या अनेक भागांतही ती संकल्पना पोहोचली.आपल्या ओतूर येथे कर्परदिकेश्वर"संगीतमय दिवाळी पहाट खुलू लागली मंदिराच्या परिसरात पहाटेच्या शांत प्रहरी संगीतमय वातावरणात फुलणाऱ्या या ‘संगीतमय दिवाळी पहाट’ची ओतूर पंचक्रोशी आतुरतेने वाट पहात आहे.
रात्र आणि दिवस यांना जोडणारी वेळ म्हणजे पहाट.ही वेळ अत्यंत शांत,आनंददायी आणि शीतल असते.सणांचा राजा असलेल्या दिवाळीत या पहाट प्रहराला विशेष महत्त्व आहे.दिवाळीच्या पहिल्या दिवशी केले जाणारे पहिले अभ्यंगस्नान पहाटे केले जाते.दिवाळी हा अंधारातून उजेडाकडे नेणाऱ्या दिव्यांचा सण असला आणि त्यासाठी रात्रीचे महत्त्व असले,तरीही या सणात पहाटेचाही संदर्भ आहे. कृष्णाने नरकासुराचा वध केला,त्याचे प्रतीक म्हणून नरक चतुर्दशी साजरी केली जाते.हा वध पहाटे झाला होता. त्यामुळे ही पहाट पवित्र मानली जाते, आणि अशी ही पवित्र पहाट दिवाळीच्या या पाच दिवसांच्या सणात अंतर्भूत झाली आहे.दिवाळी हा सर्व सणांतील मोठा सण असला तरी ओतूर पंचक्रोशीतील रसिकां- साठी होऊ घातलेला हा "संगीतमय दिवाळी पहाट" हा कार्यक्रम नक्कीच सर्वांसाठी पर्वणी ठरेल.
दानशूर व्यक्तिमत्व आमचे रमेश शिवाजी डुंबरे पाटील आणि प्राध्यापिका शुभांगी डुंबरे पाटील यांच्या सौजन्यातून आणि संकल्पनेतून साकारलेल्या ओतुरच्या भूमीत कर्परदिकेश्वर मंदिराच्या विस्तीर्ण प्रांगणात हा पहिला वहिला ऐतिहासिक दिवाळी पहाट हा संगीतमय कार्यक्रम नक्कीच अलोट गर्दीने फुलून येईल. स्वर गंगेच्या काठावरती हा पहिला वहिला दिवाळी पहाट हा संगीत महोत्सव सजवणारे कलाकार आहेत, सा रे ग म प लिटल चॅम्प विजेत्या,
इंडियन आयडल फेम पार्श्वगायिका नंदिनी गायकवाड
व अंजली गायकवाड या भगिनी मराठी भावगीते, भक्ती गीते आणि श्रोत्यांची फर्माईश यांची सुरेल मैफिल या कलाकारांकडून सादर होईल मंगळवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे साडेपाच वाजता.स्थळ- स्व.आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे कुस्ती स्टेडियम,कपर्दीकेश्वर मंदिर,ओतूर,ता.जुन्नर, पुणे.
मराठी रसिक आणि संगीताचा फार जवळचा संबंध आहे. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, गीत रामायण यांसारखे भक्तिसंगीत, मराठी चित्रपट गाणी, बासरी, तबला तसेच इतर पारंपरिक वाद्यसंगीत यांचा ‘संगीतमय दिवाळी पहाट’च्या कार्यक्रमात प्रामुख्याने समावेश केलेला आहे. ओतूर पंचक्रोशीतील रसिक श्रोत्यांसाठी संगीतमय दिवाळी पहाट हा कार्यक्रम नक्कीच मानाचे स्थान देऊन जाईल. पहाटे लवकर उठून स्नान करून अस्सल पारंपरिक मराठी पेहराव परिधान करून रसिक मंडळी संगीतमय दिवाळी पहाट या कार्यक्रमाला येतील. या सगळ्यामुळे एकूणच वातावरणात किती चैतन्य येईल. संपूर्णपणे मराठी ‘फील’ देणारी, भारावलेली अशी ही ओतूर च्या भूमीतील पहिलीच संगीतमय दिवाळी पहाट अवर्णनीय आनंद देऊन जाईल.सूर, संगीत प्रत्यक्ष समोर बसून ऐकण्याच्या आनंदाची सर कशालाच नाही. संगीतमय दिवाळी पहाट या अस्सल सांस्कृतिक, दर्दी, रसिक गोष्टींमुळे हा कार्यक्रम आणखी कलात्मक होऊन पुढे जाऊन तो फक्त घरापुरता केंद्रित न राहता समाजाभिमुख होईल, याची खात्री देतो.
संगीतमय दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे निमंत्रक दानशूर व्यक्तिमत्व श्री. रमेश शिवाजीराव डुंबरे पाटील आणि प्राध्यापिका सौ. शुभांगी डुंबरे पाटील तसेच
संयोजक श्री.अनिल शेट तांबे,श्री.पोपट नलावडे,महेंद्र पानसरे आणि संतोष वाळेकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.सर्वांच्या वतीने मी ओतूर पंचक्रोशीतील सर्वांना या आपल्या भूमीतील पहिल्या वहिल्या “संगीतमय दिवाळी पहाट” या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करत आहे.
:- धन्यवाद.🙏
लेखन:-दिपक सुकाळे (ऑस्ट्रेलिया)
संकलन:-रविंद्र भोर:-उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, पुणे जिल्हा.