शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार
निर्वी (सोनवणे मळा )येथे बिबट्याकडून पशुधनावरील हल्ले वाढत आहेत. दिवसाही बिबटे शेतकरी वर्गांना पाहावयास मिळत आहे. त्यामुळे दिवसा रानामघ्ये काम करायला शेतकरी घाबरत आहे. पाळीव प्राणी बिबट्याच्या भक्षस्थानी या घटना नवीन नाहित. पण बिबट्यांचा झालेला सुळसुळाट यामुळे मानवाला जीव गमवावा लागत आहे. अंगणात, रस्त्यावर, शेतात दबा धरून बसलेला बिबट्या सहजतेने मानवाची शिकार करत आहे. अशा घटनांनी “नुकसानभरपाई की सुरक्षीततेची हमी ” असाही बिबट्याचा वावर हा तारांकित प्रश्न निर्माण होणे गरजेचा आहे. त्यातून बिबट्याचा बंदोबस्त करण्याचामुख्य प्रश्न सुटला पाहिजे.मात्र, वनविभाग पंचनाम्यावरून ‘नुकसान भरपाई’ या नावाखाली प्राण्यांसारखा मानवाच्या जीवाचा सौदा करूलागला आहे. शेतासाठी विज दिवसा किंवा रात्री यामुळे बिबट्यांच्या हल्ल्याचा प्रश्न सुटणार आहे काय? दिवसा विजेची मागणी…!शिरूर, आंबेगाव, जुन्नर व खेड या तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली आहे. मागील काळात पाळीव प्राण्यांवर हल्ला झाला आहे. शिरूर तालुक्यात मानवावर हल्ला होण्याची घटना अधिक झाल्या आहेत.त्यामुळे रात्रीत होणाऱ्या बिबट हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी महावितरणने दिवसा विज पुरवठा करावी अशी मागणी शिरूर तालुक्यात होत आहे. सवाल जाणकारांचा ?घटना घडल्यानंतर चार दिवसात वनविभागाने एका बिबट्यांचा बंदोबस्त करून त्याला जेरबंद केले. या भागात बिबट्यांची संख्या मोठी असताना हा बिबट नरभक्षक कशावरून? शेतकामासाठी दिवसा विज मिळावी यासाठी आग्रह धरला जातो. हे योग्यही असू शकेल पण शेतीत दिवसा काम करत असताना बिबट्यापासून संरक्षण कोण करणार ? शाळेतील विद्यार्थी, प्रवासी यांचा विचार होऊन नुकसान भरपाई बरोबरच सुरक्षीततेची हमी या बाबत विचार होणे गरजेचे आहे.त्यामुळे सध्या त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. मानव आणि बिबट यांचा संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. सोनवणे वस्तीवर बिबट्याने शांताराम सोनवणे यांच्या शेळीला जबड्यात पकडून तिला उचलून नेऊन फडशा पाडला. निर्वी परिसरात बिबटयांचा वावर जास्त प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे. येथील बिबट्यांचे पशुधनावरील हल्ले हे सतत वाढत चाललेले आहेत. दररोज कुठे ना कुठे पाळीव पशू व प्राण्यांवर हल्ले होताना दिसत आहे. तसेच त्याचे दर्शन दिवसाही होऊ लागले आहे, यामुळे त्यांचा बंदोबस्त करणे खूप गरजेचे आहे. बिबट्याला भक्ष भेटले नाहीतर मनुष्यावर हल्ला करायलाही तो मागेपुढे पाहणार नाही. लोकांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. मेंढपाळ, शेतकरी,लहानमुले महिलांमध्ये कमालीची असुरक्षितेची भीती निर्माण झाली आहे.चोकट:वाढत्या बिबट्याच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांचे निर्बीजीकरण करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा हा संघर्ष पुढे धोकादायक स्थितीत येऊ शकतो. वेळीच उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.