जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर, तालुका -जुन्नर ,या महाविद्यालयाचा यावर्षीचा इयत्ता बारावीचा सर्व उत्कृष्ट निकाल लागलेला आहे. तसेच महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा १००% निकाल लागलेला असून ,इतर शाखेचा निकाल देखील खूपच चांगला लागलेला आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे यांनी दिली.
महाविद्यालयाचा सरासरी सर्व शाखेंचा शेकडा निकाल:- ९७:३५%शाखा निहाय निकाल पुढीलप्रमाणे
विज्ञान:- १००%,वाणिज्य:- ९६.५८%कला:- ९५.७७% व्यवसाय अभ्यासक्रम:-९६.८७विभागावार पहिले तीन विद्यार्थी विज्ञान शाखा:-१) उदास श्रावणी मंगेश – ९१:८३%२) डुंबरे नेहा संतोष – ८४ %३) तांबे अमृता अनिल -८०%वाणिज्य शाखा:-१)खंडागळे आरती गणेश :- ८१:१७ %२) कोयाळकर यशराज यादव:- ७१:३३%३)भोईर शुभम किसन :-७०:८३ %,कला शाखा:-१)साळवे हर्ष -७१%२) जाधव किशोर जयराम -६४:८३%,३) मोधे सुप्रिया दीपक- ६२:५०%,व्यवसाय अभ्यासक्रम:-१) अंभेरे निखिल विष्णू :- ५६:६७%२) तनपुरे वैष्णव संतोष:- ५७:३३%,गबाले ओमकार मच्छिंद्र:-५३% सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेंद्र अवघडे, कनिष्ठ विभागाचे उपकाचार्य अमृत बनसोडे, वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य, सर्व विभाग प्रमुख , महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. अशी माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे परीक्षा विभाग प्रमुख श्री.महेश गंभीर यांनी दिली.