जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
पिपरी पेंढार ता:-जुन्नर येथील गाजरपट शिवारात नानूबाई कडाळे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असल्याची घटना १० मे रोजी घडली होती त्यावेळी सदर घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी गेले असता यातील आरोपी यांनी वनरक्षक सुवर्णा खुटेकर यांचा गळा दाबून,हाताने मारहाण केली त्याचवेळी आरोपी विजय कालेकर याने तलवार हातात घेऊन उपस्थित लोकांना भडकावून दहशत निर्माण केली आणि सर्व आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून लोकांना दंगा करण्यास भडकावले व सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
यावेळी लोकांमध्ये आक्रोश निर्माण होऊन नातेवाईकांना न विचारताच कोणतीही माहिती न घेता जमलेल्या काही लोकांनी वन कर्मचारी यांना भलतेच धारेवर धरले होते एका राजकीय पुढाऱ्याने तर वन अधिकारी,कर्मचारी आणी एका पोलीस अधिकारी यांना अत्यंत उर्मट भाषा वापरली होती त्याच वेळी जमावातील काही लोकांनी महिला वनकर्मचारी यांना धक्का बुक्कीला सुरुवात केली असता त्यामध्ये सुवर्णा हनुमंत खुटेकर या वनमहिला वनकर्मचारी यांचा जमावातील काही लोकांनी गळा दाबल्याने त्या गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी पिंपळवंडी येथील एका खाजगी रुग्णालयात त्या नंतर प्रकृती खालावल्यामुळे मंचर ग्रामीण रुग्णालय तदनंतर पुणे येथील रुग्णालयात उपचारकामी दाखल करण्यात आले होते.
जमावापैकी एका इसमाने घटनास्थळी तलवार आणून दहशत निर्माण केली असल्याने परिणामी ओतूर पोलिसांत अश्विनी देविदास राऊत यांच्या फिर्यादीवरून कलम २५४,१०९,११४,१४३, ३५३,३३२,३२३,१४४,१४७,१४८,१४९,५०४,५०६ अशा विविध कलमां नुसार अंकुश तोतरे,मनोहर गाजरे,मुकुंद उर्फ भाऊ रामचंद्र कुटे,अक्षय कुटे, अश्विनी गोविंद शिंगोटे,विजय कालेकर आणी इतर दोन ते तीन ओळख नसलेल्यांवर इसमांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक अनिल केरूरकर हे करत आहेत.