जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
गुरुवार दिनांक १६ मे २०२४ रोजी मढ,ता:-जुन्नर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डिसेंट फाउंडेशन पुणे व आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने चौथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले.त्यास मढ,तळेरान, सितेवाडी,खिरेश्वर,पारगाव,खुबी व करंजाळे या परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी १०२ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली व ४१ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आले.
शिबिरामध्ये रुग्णांची नेत्र तपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया,चष्मे वाटप,प्रवास,निवास, नाश्ता व जेवण हे सर्व मोफत दिले जाते.तसेच एक महिन्याची औषधे देखील दिली जातात.तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डिसेंट फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले.
याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई,सचिव डॉ.फकीर आतार,वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वाती सारोक्ते,डॉ.श्रद्धा जोशी,शिबिर समन्वयक प्रकाश पाटील,परिचारिका प्रिया शिरसाट, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी पांडुरंग मोढवे, चंद्रकांत मस्करे, मुरलीधर मोढवे, पांडुरंग मस्करे, निवृत्ती सदाकाळ, आरोग्य सेवक, अशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मढ,तळेरान,सितेवाडी,पारगाव, खुबी,’करंजाळे व खिरेश्वर येथील जेष्ठ नागरिक संघांनी व प्राथमिक आरोग्य केंद्र मढ यांनी प्रयत्न केले.