शिरूर पोलीस ठाणे व गंगा माता वाहन शोध संस्थेचा उपक्रम.
शुभम वाकचौरे
सन २००३ पासुन शिरूर पोलीस ठाणे आवारात जप्त, बिनधनी व अपघात ग्रस्त वाहने हे मा. न्यायालयीन प्रक्रीया संबधीत वाहन मालकांनी पुर्ण न केल्याने व बेवारस वाहनांचे मालक मिळुन येत नसल्याने ही वाहने पोलीस स्टेशनचे आवारात मालकांचे प्रतीक्षेत धुळ खात पडुन होती. त्याच प्रमाणे वाहनाचे ऊन व पाऊसामुळे तसेच अधिक कालावधी करीता एकाच ठिकाणी उभे राहून नुकसान होत होते. त्या वाहनांमुळे पोलीस ठाणे परीसरात सुटसुटीत काम करणे जिकीरीचे झाले होते. सदर वाहन हे खुप दिवसापासून शिरूर पोलीस ठाणे येथे पडुन असल्याने त्याची विल्हेवाट लावण्याबाबत मा. श्री. अंकीत गोयल पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण यांनी आदेशीत केले होते.
वरीष्ठांचे आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप यांनी गंगा माता वाहन शोध संस्थेचे अधिकारी व कर्मचारी यांची मदत घेत शिरूर पोलीस ठाणे आवारात असलेल्या एकुण ४०० हुन अधिक जप्त, बिनधनी व अपघात ग्रस्त वाहना पैकी एकूण २२० वाहनाचे चॅसी नंबर व इंजिन नंबर याचे मदतीने मालकाचे नाव व पत्ता काढण्यात आलेले आहेत. वाहनाचे मालकांचे दिले पत्यावर त्यांना वाहन ताब्यात घेणेकामी ०८ दिवसाच्या आत येण्याबाबत कळविण्यात येणार आहे. वाहन मालक वाहन सोडविण्या करीता पोलीस ठाणे येथे हजर न राहील्यास त्यांना वाहनामध्ये स्वारस्य नाही असे समजुन सदर वाहनाचा लिलाव करून येणारी रक्कम शासनाकडे जमा करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप यांनी कळविले आहे. शिरूर पोलीस ठाणे येथे आवारात जप्त, बिनधनी व अपघात ग्रस्त वाहने हे मालकांच्या ताब्यात मिळण्याचे काम आता सोईस्कर झाल्याने शिरूर परीसरातील लोंकाना त्यांचे रोजचे वापरा करीता वाहने मिळणार असल्याने लोकामध्ये अनिदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
वरील कार्यवाही मा. श्री. अंकित गोयल पोलीस अधीक्षक सो, मा. श्री. निलेश गटटे अपर पोलीस अधिक्षक से, पुणे व मा. श्री. यशवंत गवारी उपविभागीय पोलीस अधिकारी सो, शिरूर यांचे मागदर्शना खाली श्री. संजय जगताप पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस ठाणे व सर्व अधिकारी, पोहवा परशराम सांगळे, पोना बापू मांडगे, राजेंद्र वाघमोडे, बाळु भवर, मपोकॉ अर्चना यादव, शेखर झाडबुके, विरेंद्र सुबे व गंगा माता वाहन शोध संस्था, परंदवाडी ता. मावळ जि. पुणे यांचे अध्यक्ष राम उदावंत, उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे, संजय काळे व भारत वाघ यांनी परीश्रम घेतले आहेत.