अनेक वर्ष राज्य माळशेज रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून आजपर्यंत मोठा संर्घष केला.
जुन्नर प्रतिनिधी :- रविंद्र भोर
अनेक वर्ष राज्य माळशेज रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून आजपर्यंत मोठा संर्घष केला. तब्बल २५ वर्षापेक्षा अधिक कालखंडरखडलेल्या शिवाय ठाणे, पुणे व अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरू पहात असलेल्या माळशेज रेल्वे मार्ग लवकरात लवकर मार्गी लागावा अशी मागणी प्रवाशांमधुन होत आहे. या बाबत मिळालेल्या माहीती नुसार माळशेज रेल्वे कृती समितीने हा मार्ग व्हावा म्हणून आज पर्यंत अनेक वर्ष राज्य माळशेज रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून आजपर्यंत मोठा संर्घष केला आहे. या मार्गाचे तांत्रीक सर्व्हेक्षण एक वर्षापूर्वीच पूर्ण करण्यात आले असल्याची माहीती समजते.
तसेच हा मार्ग कल्याण,अंबरनाथ,मुरबाड,माळशेज घाट,ओतूर ते नगर असा जाणार असून या मार्गावर कल्याण ,विठ्ठलवाडी,उल्हासनगर,अंबरनाथ कांभा रोड,आपटी, पाटगाव,मुरबाड,राव,ड्राहेरी मिल्हे,नागतार केबिन ,वारीवघर केबिन,देवरूखवाडीकेबिन,मढ,जुन्नर केबिन,मढ,जुन्नर रोड,ओतूर, पादरवाडी,आळेफाटा, ,माळवाडी,कोटडावाडी, शिंदेवाडी,वासुंदे, धोत्रे,भाळवणी,हमीदपूर आणि अहमदनगर अशी रेल्वे स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहे . हा रेल्वे मार्ग पूर्णतः फायद्यात असल्याचे सांगण्यात येत असुन माळशेज पट्टा व ग्रामीण भागातील विकासाला चालना देणारा प्रकल्प आहे.
माळशेज रेल्वे धावल्यास ठाणे,पुणे व नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दूरची बाजारपेठ नजीक उपलब्ध होणार असून या भागातील शेतक-यांना आपल्या शेतातील माल मुंबई या ठिकाणी विकण्या- साठी दररोज नेता येणार आहे.त्यांना उत्पन्नाचा नवीन पर्याय मिळणार आहेत, तसेच जुन्नर,आंबेगाव,पारनेर या तालुक्यातील लाखो- जण नोकरीसाठी मुंबई या ठिकाणी साठी गेलेले आहेत त्यांणा हा प्रकल्प झाल्यास दररोज अपडाऊन करता येईल.शिवाय पर्यटनं व्यवसायाला देखील चालना मिळणार असून पर्यटन क्षेत्रात जुन्नरतालुक्यात माळशेज रेल्वे क्रांती निर्माण करेल असा तज्ञांकडून अंदाज वर्तवीला जात आहेत.
यापलीकडे नगर -औरंगाबाद मार्गे पुढे विशाखापट्टणम हा मार्ग देखील जवळ होऊन जोडला जाऊ शकतो,त्यामुळे हा नवा माळशेज रेल्वे मार्ग ठाणे, पुणे व नगर या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विकासाचे नवीन पर्व घेऊन येणार असे वाटते आहे. तसेच हा मार्ग होण्यासाठी शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे तसेच माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील तसेच जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे यांनी पुढाकार घेऊन शासन दरबारी मांडुन हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी होत आहे.