निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार
निर्वी प्रतिनिधी शकील मनियार पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी घेतलेला पुढाकार आणि कृषी विभाग ग्रामपंचायत व महसूल विभाग वन विभाग नियोजन करून संपूर्ण जिल्ह्यात वनराई बंधारे टाकण्याचे काम जोरदार सुरू आहेनिर्वी ता शिरूर जि पुणे येथे हि कृषी विभाग व ग्रामपंचायत वतीने कृषी सहायक जयवंत भगत साळवे भाऊसाहेब व कृषी पर्यवेक्षक शिवाजी गोरे यांच्या पुढाकाराने दोन वनराई बंधारे आज टाकण्यात आले या वर्षी पर्जन्यमान अतिशय कमी झाले असुन पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंब ना थेंब जमित मुरावा व भुजल पातळी वाढावी या कामी वनराई बंधारे चे महत्त्व पटवून देऊन कृषी सहायक जयवंत भगत सह ग्रामसेवक साळवे भाऊसाहेब यांनी आवाहन केले.
आवाहनाला प्रतिसाद म्हणून मोहनराव सोनवणे मंगेश सोनवणे दत्तात्रय सोनवणे मारूती भोसले संतोष सोनवणे प्रमोद राजगुरूव यांनी श्रमिक योगदान दिले शेतकऱ्यांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा तसेच लोकसहभागातुन अनेक बंधारे उभारण्यात यावेत असे आवाहन जयवंत भगत यांनी केले आहे निर्वी परिसरातील वनराई बंधारे साठी भौगोलिक परिस्थिती अनुकूल असून जास्तीत जास्त लोकसहभाग लाभला तर जिल्हात सर्वाधिक वनराई बंधारे म्हणून गावाचे नाव लौकिक व्हावे व गावातील पाण्याची पातळी वाढली जावी यासाठी महसूल विभाग ग्रामपंचायत विभाग कृषी विभाग पुढाकार घेत असुन ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद देऊन लोकसहभाग नोंदवावा असे भावनिक आवाहन त्यांनी केले.