नीर्वी प्रतिनिधी : शकील मनियार
ता.शिरूर : गोलेगाव परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली.गणपती बाप्पाच्या आगमनाने आनंददायक असणारे भाविक व शेतकऱ्यांना वरूणराजाने एक सुखद धक्का दिला आहे. दिवसभर कमालीचे उकाड्याने उष्णता निर्माण झाली होती.काल दुपारी चार वाजता वाऱ्यांसह पावसाने अचानक दमदार हजेरी लावली .यामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर पुराचे पाणी वाहत होते.गावठाण परिसरात डोंगरावरून खाली वाहत आलेल्या पाण्यामुळे ग्रामपंचायतची भूमिगत असणारे गटारी पाण्याच्या दाबामुळे तुंबल्यामुळे पाण्याचा लोंढा डांबरी रस्त्यावरून नागरिकांच्या घरात जात होता. या ठिकठिकाणी असणारे ग्रामपंचायतचे चेंबरमध्ये पाणी न जाता बाजूने पाणी वाहत होते.पावसाचा व वाऱ्याचा जोर इतका होता. की काही व्यावसायिकांनी आपले दुकान काही वेळ बंद ठेवले होते. यामध्ये विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता.