पोलीस पाटील राहुल जगताप यांनी उत्तम कामगिरी केल्या मुळे हा सन्मान करण्यात आला.
शुभम वाकचौरे
जांबूत: शिरूर येथे पार पडलेल्या शांतता कमिटीच्या मीटिंग मध्ये मा.अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या हस्ते पोलीस पाटील राहुल जगताप यांचा सन्मान करण्यात आला. पोलीस पाटील राहुल जगताप यांनी उत्तम कामगिरी केल्या मुळे हा सन्मान करण्यात आला.
शिरूर तालुक्यातील वडनेर या गावात मागील काळात खुनाचा प्रकार घडला.ही घटना घडल्या नंतर शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी विविध माध्यमातून घडलेल्या घटनेची माहिती प्रसिद्ध केली. ही घटना समजल्यानंतर पोलीस पाटील राहुल जगताप व काही पोलीस मित्र यांच्या माध्यमातून खून करणाऱ्याचा शोध सुरू झाला. हा शोध सुरू असताना जांबूत मध्ये आरोपी आढळून आल्यामुळे ताबडतोप पोलीस पाटील यांनी पोलीस प्रशासनाला ही माहिती दिली. त्यामुळे जांबुत मधून आरोपीला पकडण्यात पोलीस प्रशासनाला यश आले. पोलीस पाटील सतर्क असल्यामुळे आरोपीला पकडण्यात मदत झाली. या उत्कृष्ट कामगिरी मूळे राहूल जगताप यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे,उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी,सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप यादव,नायब तहसिलदार स्नेहा गिरी गोसावी,माजी नगराध्यक्ष नसीम खान,शिरूर नगरपरिषदेचे अधिक्षक आयुबभाई सय्यद,राजेंद्र लोळगे, शशीकला काळे, वैशाली गायकवाड, भाजपचे तालुकाध्यक्ष आबा सोनवणे, रविंद्र खांडरे, वर्धमान रूणवाल, राजेंद्र गोपाळे, पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी केले तर आभार सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप यादव यांनी केले.