प्रतिनिधी : एकनाथ थोरात
शिरूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मागणी..राष्ट्रीय मानवाधिकार यांच्या वतीने गटविकास अधिकारी यांना सीसीटिव्ही कॅमेरा बाबत निवेदन.
शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोर त्याचा फायदा घेतात. गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने गावात घडणाऱ्या घटना कॅमेरे मध्ये दिसत नाही. त्यामुळे गावामध्ये सुरक्षितता व चोऱ्यांना पायबंद व्हावा आणि कोणी चोरी केली ती उघड व्हावी तसेच बहुतांश भागात एक नवा ट्रेड आला आहे की सध्या रोडरोमियोंचे वाढदिवस ग्रामपंचायतच्या प्रांगणात मोठ्या थाटामाटात केले जातात व त्यामध्ये काही अनुचित प्रकार ही घडवून आणतात अशा तरुणाईला आळा बसवण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतींना सूचना करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे असे निवेदन राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार निवारण भारत कार्यकारणी यांच्या वतीने शिरूर पोलीस स्टेशन तसेच पंचायत समिती गटविकास अधिकारी महेश डोके तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी राम जगताप यांना देण्यात आले यावेळी राष्ट्रीय महासचिव रमेश मामा गणगे,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संतोष कांबळे, महाराष्ट्र युवा अध्यक्ष बाळासाहेब मदने, महाराष्ट्र कार्याध्यक्ष दीपक खैरे सर ,रविराज बाबा गंगावणे,पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष संभाजी साबळे सर, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष निलेश धुमाळ पाटील, शिरूर तालुका अध्यक्ष बाबाजी रासकर, शिरूर तालुका उपाध्यक्ष हेमंत वायदंडे, शिरूर शहराध्यक्ष शकील भाई मनियार, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रेय मुसळे, जिल्हा सरचिटणीस मीडिया प्रमुख एकनाथ थोरात, सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळूंज, पत्रकार शुभम वाकचौरे यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले. व ज्या ग्रामपंचातीतर्फे सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत त्यांची स्पष्टता उच्च दर्जाची आहे का याची पाहणी करण्याची विनंती या वेळी करण्यात आली.