प्रतिनिधी : जिजाबाई थिटे ”

संत सोपान काका सुंदर माझी शाळा अभियान”पश्चिम महाराष्ट्रातील शालेय शिक्षण क्षेत्रातील अभिनव प्रयोग आहे.या अभियानाच्या अंमलबजावणीमुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये वेगळ्या प्रकारे स्वच्छता व आरोग्य विषयक बाबींची जाणीव होत आहे.शालेय शिक्षण क्षेत्रात आरोग्य विषयक स्वच्छता,पर्यावरण तसेच शैक्षणिक विकासाला आवश्यक घटकांचा समावेश या उपक्रमात करण्यात आलेला आहे.हा उपक्रम राज्यासाठी आदर्शवत विचारधारा असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर यांनी केले.जातेगाव बु ॥ (ता.शिरूर ) येथील श्री.संभाजीराजे विद्यालयात संत सोपानकाका सुंदर माझी शाळा अभियानासाठी जिल्हास्तरीय पथक तपासणीसाठी आले होते.याप्रसंगी राष्ट्रपती पारितोषिक विजेते कुंडलिक मेमाणे,मुंबई सेकंडरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुधाकरजगदाळे,मुख्याध्यापक हनुमंत पवार , प्राचार्य रामदास थिटे,विद्यालयीन शिक्षक वृंद व मान्यवर उपस्थित होते.अभियानाबाबत आधिक माहिती देताना प्राचार्य रामदास थिटे म्हणाले,”संत सोपानकाका सहकारी बँकेद्वारे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे ,सातारा , सोलापूर,सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात संत सोपान काका – सुंदर माझी शाळा अभियान स्पर्धा शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना स्पर्श करणारे आहेअभियानामध्ये इमारत व भौतिक सुविधा,विद्यार्थी पटसंख्या,आरोग्य विषयक उपक्रम,पर्यावरण,स्वच्छता विषयक उपक्रम,गुणवत्ता,स्वच्छतागृह,शाळेचे वैशिष्ट्यपूर्ण निकषांव्दारे शिक्षण विकासाला चालना देणारे अभियान आहे.सर्वच शाळांनी अभियानादारे शालेय गुणवत्ता व सुविधांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.श्री संभाजीराजे विद्यालयाने अभियानात सहभागी होत सर्व उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे.संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल उमाप,उपाध्यक्ष सुगंध उमाप व सचिव प्रकाश पवार यांनी या अभियानास शुभेच्छा देत शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश बांगर यांनी केले तर आभार संतोष डफळ यांनी मानले .

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button