प्रतिनिधी – विजय थोरात
टाकळी हाजी येथील ग्रामीण विकास शिक्षण मंडळाचे मा.बापूसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व इतर संस्थेचे मा.बापूसाहेब गावडे पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली, यावेळी मा.बापूसाहेब गावडे पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी दौलत सोनवणे व व्हाईस चेअरमनपदी दादाभाऊ पानमंद,मानद सचिवपदी राजेंद्र कुंजीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.कार्यकारी संचालक अनुक्रमे लक्ष्मण सोदक,ज्ञानेश्वर निचित,प्रविण कांदळकर,नवनाथ लाळगे,नागेश केदारी,महादेव गावडे,आशा मोहरे,रंजना निचीत यांची निवड करण्यात आली.या नवीन कार्यकारणी निवडीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव गावडे,सचिव राजेंद्र गावडे,सहसचिव सुनिता गावडे, सेवानिवृत्त प्राचार्य आर.बी.गावडे, व्यवस्थापकीय संचालक अजित गावडे व संस्थेच्या शिक्षकांनी अभिनंदन केले.