प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.मुबंई या पतसंस्थेचा पुणे,पिंपरी- चिंचवड आणि शिक्रापूर या शाखेचा सभासद पाल्य गुणगौरव सोहळा रविवार दि.१३आक्टोंबर २०२४ रोजी पुणे येथे संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पूर्वीची तीन लाख रुपये कॅशलेस मेडीक्लेम योजना आता१ नोव्हेंबर पासून पाच लाख रुपये कॅशलेस मेडीक्लेम योजनेत विस्तारीकरण करणार शिवाय ज्या सभासदांना आपल्या आई- वडील आणि सासू सासरे यांचा समावेश या योजनेत करावयाचा असल्यास वेगळा प्रिमियम भरुन सहभागी होता येईल असे यावेळी सांगितले तसेच संस्थेची पन्नास वर्षाकडे वाटचाली मुळे सभासदांसाठी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले त्यामुळे सभासदांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सचिव सतिश गवळी,पी.डी.सी.सी. बकेचे अध्यक्ष दिगांबर दुर्गाडे ,महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळचे सचिव व पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे कार्याध्यक्ष शिवाजी कामठे,मा.अध्यक्ष सुजीत जगताप, पिंपरी- चिंचवड शहराचे अध्यक्ष संभाजी पडवळ ,कुंडलिक मेमाणे,पुणे जिल्हा शिक्षक परिषदेचे उपाध्यक्ष जितेंद्रकुमार थिटे,विठ्ठल गवारी,सहसचिव सतिश माने, खजिनदार सतेश शिंदे,तज्ज्ञ संचालक गुलाबराव गवळे,संचालक जगन्नाथ जाधव,प्रमोद देशमुख,गोविंदराव सुळ, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळचे उपाध्यक्ष व संचालक सचिन नलवडे ,शकिल अन्सारी अजित चव्हाण,उपस्थित होते. विद्यार्थांचा फेटा बांधून व प्रशिस्तपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे यांनी तर स्वागत पालक संचालक तुकाराम बेनके यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय रोकडे यांनी तर आभार संचालक पांडुरंग कणसे यांनी मानले.