( सरदवाडी )रविवार दिनांक 13/8/23 रोजी सायंकाळी सहा वाजता बिबट्याने सरदवाडी मधील माजी पोलीस सब इन्स्पेक्टर मारुती सरोदे यांच्या घराच्या अंगणात अनेक कोंबडी-कोंबड्यांवर हल्ला करून ताव मारला व रात्री सरदवाडी परिसरात व कर्डलवाडी परिसरात धुमाकूळ घातला तसेच सरदवाडी येथील सरोदे वस्ती येथे जनार्दन सरोदे यांच्या गोठ्यातील वासरावर बिबट्याने हल्ला करून वासरू जागीच ठार केले .ही घटना रविवारी रात्री सात ते आठच्या दरम्यान घडली व नंतर सतीश किसन सरोदे यांच्या कुत्र्यावर हल्ला करून कुत्र्यास ठार केले. याची माहिती मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष गणेश सरोदे यांनी शिरूर येथील वनविभागाचे वनपाल भुतेकर साहेब यांना दिली व भुतेकर साहेब यांनी सदर घटनेचे गांभीर्य ओळखून प्रत्यक्ष जागेवर येऊन घटनेची पाहणी केली.संबंधित शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी तृप्ती सरोदे यांनी केली आहे .सदर परिसरामध्ये भीतीचे वातावरण असून त्या ठिकाणी ताबडतोब पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी युवा उद्योजक गणेश सुनील सरोदे यांनी केली. सदर वस्तीवर सरदवाडी गावचे सरपंच विलास कर्डीले यांनी भेट देऊन फटाके वाजवण्याच्या सूचना केल्या व पिंजरा लावण्याची व्यवस्था करतो असेही सांगितले. प्रसंगी जनार्दन सरोदे, सुभाष सरोदे ,करण सरोदे ,मराठा सेवा संघाचे शिरूर तालुका उपाध्यक्ष संदीप सरोदे व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
By shirurmaharashtranews.com
पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232