शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
प्रशांत प्रकाश पवार यांची शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी पार्टीच्या काँग्रेस सोशल मीडिया सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार व शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष विश्वासकाका ढमढरे यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले. प्रशांत पवार यांच्या माध्यमातून शिरूर लोकसभा मतदार संघाच्या सोशल मीडियाचे कार्य अधिक गतिमान पद्धतीने पुढे जाईल हा विश्वास वाटतो. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रशांत पवार म्हणाले की खासदार डॉ अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे विचार तळागाळातील कार्यकर्ते पर्यंत पोचविण्याचे काम सर्वांना बरोबर घेऊन करणार असल्याचे मत सांगितले.