निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार

मुस्लिम धर्माचे प्रोषित हजरत मोहम्मद पैगंबर सहाब यांच्या जयंतीनिमित्त शिरूर शहरांमध्ये जुलूस काढण्यात आला होता यावेळी सर्व धर्मीय नागरिक उत्साहात सहभागी झाले होते.इस्लामिक तारीख 12 रब्बी उल या दिवशी इस्लामचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर साहब यांचा जन्म झाला होता याच तारखे दिवशी संपूर्ण जगामध्ये त्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येत असते.लाटे अळीतील मलंग शहा बाबा दर्गा पासून निघालेल्या जुलूस मध्ये लहान मुलांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जुलुसच्या शुभारंभ प्रसंगी नगर परिषदेचे सभागृह नेते प्रकाश शेठ धारीवाल यांच्या हस्ते इस्लामच्या धर्म ध्वजला पुष्पहार अर्पण करून जुलूसला सुरुवात करण्यात आली.यावेळी माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, विश्वास भोसले, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष नामदेवराव घावटे, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे, रवींद्र बापू सानप,माया गायकवाड, शोभना पाचंगे, वैभव यादव, रामदास थोरात,रेश्मा शेख, शरद कालेवार, कार्याध्यक्ष हाफिज बागवान, नितीन पाचरणे, निलेश जाधव ,अविनाश घोगरे, किरण बनकर, निलेश खाबिया,संतोष शितोळे, अनधा पाठकजी, रवींद्र धनक, मंगेश खांडरे, संजय देशमुख,दादाभाऊ वाखारे, सचिन धाडीवाल, व आदी मान्यवर उपस्थित होते.मौलाना सोहेल रजा यांनी यावेळी सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले इस्लाम धर्म विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. दरम्यान शहरातून निघालेल्या जुलूस मध्ये मुस्लिम तीर्थक्षेत्रांच्या प्रतिमा ट्रॉलीवर ठेवून तसेच हातामध्ये ध्वज घेऊन त्यांची मिरवणूक काढण्यात आली.

मुस्लिम जमातीचे अध्यक्ष इक्बालभाई सौदागर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. माजी नगराध्यक्ष नसीम खान यांनी प्रास्ताविक केले फिरोज बागवान यांनी सूत्रसंचालन केले माजी उपनगराध्यक्ष जाकिर खान पठाण यांनी सर्वांचे आभार मानले.हुसेन शहा, सिकंदर मणियार, कदीर सौदागर, शाहरुख आत्तार, शाबान शाह, नसरुद्दीन शेख, जमीर सय्यद, साबीरभाई शेख आदीसह स्थानिक कार्यकर्त्यांनी या मिरवणुकीचे संयोजन केले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महीबूब सय्यद, शिरूर अध्यक्ष प्रवासी संघ अनिल बांडे, मा. शहराध्यक्ष संदीप कडेकर शिरूर शहराध्यक्ष जनहित कक्ष रवी लेंडे, शिरूर तालुका अध्यक्ष विधी विभाग मनसे ॲड.आदित्य मैड, मा. शिरूर शहर अध्यक्ष अविनाश घोगरे या सर्व मान्यवरांच्या वतीने पैगंबर जयंतीच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर त्यांनी गणेश विसर्जनाच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले होते.शिरूर चे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी व पोलीस निरीक्षक संजय जगताप तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी चौख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button