भूजल पातळी वाढणार
जुन्नर प्रतिनिधी : – रविंद्र भोर
मांदारणे ता:-जुन्नर येथे कृषी विभाग ओतूर यांनी गावकऱ्यांच्या मदतीने श्रमदानातून बुधवार दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोजी मौजे मांदारणे या गावामध्ये तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले मंडळ कृषी अधिकारी प्रवीण नंदकुळे व कृषी पर्यवेक्षक भगवान पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहायक डी एन राठोड यांनी श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याचे काम केले आहे त्यामुळे जवळपास चार वनराई बंधारे मांदारणेत भांमकाई डोंगरावर उगमस्थानअसलेल्या ओढ्यावर उभारण्यात आले आहे.
गावांमधील सर्व ग्रामस्थ, सरपंच सविता ठोसर सर्व ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच विष्णू भोर आणि दीपक भले,होनाजी काळे,मारुती काळे या आदिवासी बांधवांच्या श्रमदानातून व सहकार्याने गावात वनराई बंधारे बांधण्यात आले विशेष म्हणजे या बंधारे बांधकामला कोणत्याही अनुदानाचा वापर केला नसून तेथील नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून बांधले गेले.
त्यामुळे तेथील जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा व वन्य प्राण्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे व वाहून जाणारे पाणी आडविल्यामुळे आणि ते जमिनीत मुरल्यामुळे त्या परिसरातील विहिरींच्या आणि बोरवेलच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे आणि त्या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना शेतीसाठी होणार आहे.