शुभम वाकचौरे
जांबूत: शिरूर येथे बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य अधिवेशन तयारी अंतर्गत पुणे जिल्हास्तरीय अधिवेशन (ता : ११ ऑक्टोंबर) रोजी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
बहुजन मुक्ती पार्टीचा मुख्य विषय भारतात लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर या देशातील निवडणूका मुक्त, निष्पक्ष व पारदर्शी (Free, Fair & Transparent) झाल्या पाहिजेत.आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा आणि ओबीसी यांच्यात अविश्वासाचे वातावरण निर्माण करून दोन्ही समाजात जातीय तेढ निर्माण करून भांडण लावणे. हा शासक जातीचा फोडा आणि राज्य करा. या धोरणाचा परिणाम आहे. शासक जातीचा शेती व शेतकरी विरोधी धोरणामुळेच आज शेतकऱ्यांच्या हजारो समस्या निर्माण झाल्या आहेत व त्यामुळेच लाखो
शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ६२ हजार शाळांचे खाजगीकरण करून बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित करणे. या विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा. सुनील जाधव. (राष्ट्रीय कार्य सदस्य नवी दिल्ली तथा राज्य प्रवक्ता, बहुजन मुक्ती पार्टी) यांना देण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा. धनंजय मालुसरे (सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज) उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ मगण ससाणे,सतीश आरवडे,युवराज सोनार, फिरोज सय्यद,अनिल गायकवाड, ॲड. राहुल मखरे, नाथाभाऊ पाचर्णे, फैजल पठाण, चेतन साठे, सागर घोलप, अशोक गुळादे, नानासाहेब चव्हाण, अमोल लोंढे, वैशाली राक्षे, सुनीता कसबे, बाबासाहेब भोंग, कचर गायकवाड,दिलीप सोदक, विशाल रणदिवे , प्रशांत घोडे,संतोष भिसे ,प्रदीप सोनवणे,आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू कांबळे यांनी केले.तर आभार समाधान लोंढे यांनी मानले.