शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार
शिरूर तालुक्यात प्रथमच दिनांक 28/07/2024 रोजी ,महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा सन 2023 24 मधील शिरूर तालुक्यातील राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या व त्यांना यामध्ये मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरूर करत आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन महीबूब सय्यद उपाध्यक्ष मनसे पुणे जिल्हा, एडवोकेट आदित्य मैड अध्यक्ष मनसे शिरूर शहर, रवी लेंडे सचिव मनसे शिरूर शहर,अविनाश घोगरे तालुका संघटक शिरूर, बंडू दुधाने उपाध्यक्ष शिरूर शहर, असलम शेख उपाध्यक्ष शिरूर शहर ,विकास साबळे विभाग अध्यक्ष शिरूर शहर, शुभम गिरे उपाध्यक्ष शिरूर शहर, रंगनाथ भालेराव विभागाध्यक्ष शिरूर शहर वसीम शेख विभाग अध्यक्ष शिरूर शहर, संदीप कडेकर मा. अध्यक्ष शिरूर शहर, अविनाश चौधरी उपाध्यक्ष शिरूर ,मोहसीन काजी विभाअध्यक्ष शिरूर ,एडवोकेट स्वप्निल माळवे विधी विभाग अध्यक्ष पुणे जिल्हा, विनायक खांडरे विभाअध्यक्ष शिरूर शहर, रवी गुळादे उपाध्यक्ष शिरूर तालुका, गौरव शिंदे उपाध्यक्ष शिरूर शहर संतोष कोठावळे विभाध्यक्ष शिरूर प्रवीण तुबाकी उपाध्यक्ष शिरूर शहर या सर्वांनी केलेले आहे.तर या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित म्हणून, किशोर राजे निंबाळकर, डॉक्टर ज्योती परिहार, अविनाश जाधव, राजेंद्र उर्फ बाबू वागस्कर, प्रवीण परदेशी, बाळासाहेब मस्के, प्राचार्य कुलकर्णी, अनिल शितोरे, नंदू भाई तळवळेकर ,भाऊराव कराडे ,महेश डोके राहणार आहेत.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून किशोर शिंदे, अजय शिंदे ,बाळा शेंडगे, साईनाथ बाबर, हेमंत बत्ते ,रवींद्र गारुडकर ,रामदास दरेकर, मकरंद पाटील, अमोल भोसले, स्मिता काळे ,अनिल बाबर, बाळकृष्ण कळमकर, रवींद्र उर्फ बापू सानप, चंद्रकांत आपटे, ईश्वर पवार हे असणार आहेत.शिरूर तालुक्यातील अनेक शाळेमधील मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत ,त्याचबरोबर सन्माननीय उपस्थित मध्ये अनेक मान्यवरही उपस्थित राहणार आहेत अशी माहिती मनसे जिल्हा उपाध्यक्ष महीबुब सय्यद यांनी दिली.